ऑनलाइन लोकमत -
काबूल, दि. 04 - पश्चिम अफगाणिस्तानमध्ये परदेशी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. हेरात येथे तालिबान दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात सहा पर्यटक जखमी झाले आहेत. तालिबान दहशतवाद्यांनी अद्याप या हल्ल्याची अधिकृतपणे जबादारी स्किकारलेली नाही. परदेशी पर्यटकांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. विशेष म्हणजे अफगाण लष्कराचा ताफा सोबत असतानाही हा हल्ला झाला.