तालिबानच्या (Taliban) मदतीसाठी पाकिस्तानने पंजशीरमध्ये (Panjshir) लढाऊ हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे बॉम्बफेक करून पंजशीर ताब्यात घेण्यास मदत केली होती. यामुळे आज मध्यरात्री अज्ञात लढाऊ विमानांनी पंजशीरमध्ये तालिबानच्या तळांवर हल्ला चढविला. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणेही स्पष्टीकरण आलेले नाही. स्थानिक मीडियानुसार हवाई हल्ले झाले आहेत. (Fighter jet attacks on Taliban bases in Afghanistan's Panjshir valley; several militants killed: Reports)
Panjshir Fall: पंजशीर पडले? तालिबान्यांनी गव्हर्नर ऑफिसवर झेंडा फडकवला; सालेह, अहमद मसूद सोडून गेले
रविवारी रात्री पाकिस्तानच्या हवाई दलाने लढाऊ विमाने आणि ड्रोनच्या साह्याने अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या घरासह अन्य ठिकाणी बॉम्बफेक केली होती. यानंतर काही वेळातच तालिबानने पंजशीरच्या राजधानीमध्ये घुसून गव्हर्नर हाऊसवर झेंडा फडकविल्याचे फोटो पोस्ट करून पूर्ण तालिबानवर ताबा मिळविल्याचा दावा केला होता. तालिबानच्या या आक्रमणामुळे पंजशीरचे शेर म्हटले जाणारे नेते पंजशीर सोडून गेले आहेत. जमिनीवरून आक्रमण होत असताना पंजशीरच्या रेझिस्टंस फ्रंटचे कंबरडे मोडण्यासाठी पाकिस्तानी हवाई दलाने ड्रोन आणि लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे हल्ले चढविले. यामध्ये अहमद मसूद यांचा जवळचा नेता फहीम दश्ती आणि टॉपचा कमांडर जनरल साहिब अब्दुल वदूद झोर मारला गेला आहे.
Afghanistan: पंजशीरच्या अहमद मसूदला तगडा झटका; तालिबानच्या हल्ल्यात फहीम दश्ती ठार
तालिबानच्या दाव्यानुसार त्यांनी पंजशीर घाटीवर ताबा मिळविला आहे. तर रेझिस्टंस फ्रंटचा दावा आहे की अद्याप पंजशीरवर त्यांचाच ताबा आहे. यामुळे लढाई अद्याप संपलेली नाही. आज मध्यरात्री अज्ञात विमानांनी तालिबानच्या पाच तळांवर हल्ले केले आहेत. यामध्ये काही दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले जात आहे. तालिबानच्या हजारो दहशतवाद्यांनी रातोरात पंजशीरची सारी शहरे ताब्यात घेतल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामुळे नॉर्दर्न रेझिस्टंस फ्रंटचे लढवय्ये आता पहाडींमध्ये गेले असून तिथे गोरिल्ला युद्ध सुरु झाले आहे. याच भागात अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी आपला ठिकाणा बनविला आहे.
सावधान! अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या सामर्थ्यानं भारताला धोका; CIA च्या माजी अधिकाऱ्याचा दावा
पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडले...पंजशीरवर तालिबानच्या कब्ज्याच्या दाव्यावर अहमद मसूद यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. नॉर्दन अलायंस रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणार आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानाला आम्ही पाडले आहे, असे ते म्हणाले.