काबूल: कोणताही रक्तरंजित संघर्ष न करता अफगाणिस्तान ताब्यात घेण्याचा दावा करणाऱ्या तालिबानला आता मोठा धक्का बसला आहे. तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये सत्तेतील वाट्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत. तालिबानचा सहसंस्थापक अब्दुल गनी बरादर आणि हक्कानी गटात गोळीबार झाला. त्यामुळे दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष पाहायला मिळत आहे.
अफगाणिस्तानातील वृत्तपत्र पंजशीर ऑब्जर्व्हरनं दिलेल्या वृत्तानुसार, अनस हक्कानीकडून गोळीबार करण्यात आला. त्यात मुल्ला बरादर जखमी झाला. त्याच्यावर पाकिस्तानात उपचार सुरू आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा करून तीन आठवडे उलटले आहेत. अमेरिकन सैन्यानं देशात माघार घेऊन आठवडा होत आला आहे. मात्र अद्याप तालिबानला सरकार स्थापन करता आलेलं नाही. ...तर मला गोळी मार; काबूल तालिबानकडे जाताच सालेह यांचा बॉडीगार्डला आदेश
तालिबान आणि हक्कानी गटात सत्तेसाठी सुरू असलेला संघर्ष पाहून पाकिस्ताननं आयएसआयमध्ये चीफ लेफ्टनंट जनरल पदावर कार्यरत असलेल्या फैझ हमीद यांना काबूलला पाठवण्यात आलं. दोन्ही गटातील वाद मिटवण्यासाठी त्यांना काबूलला पाठवलं गेलं आहे. हक्कानी नेटवर्कनं संरक्षण मंत्रीपद मागितलं आहे. पाकिस्तानची आयएसआय हक्कानी नेटवर्कची प्रमुख संरक्षक आहे. अल कायदाशी जवळचे संबंध असल्यानं संयुक्त राष्ट्रानं हक्कानी नेटवर्कला दहशतवादी गटांच्या यादीत ठेवलं आहे.
तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या हालचालीतालिबान, हक्कानी नेटवर्क यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी फैझ हमीद काबूलला रवाना झाले आहेत. मुल्ला अब्दुल गनी बरादर, क्वेटा शूराचा मुल्ला याकूब, मुल्ला उमरचा मोठा मुलगा आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात असलेले मतभेद कमी करण्याची जबाबजारी हमीद यांना देण्यात आली आहे. तालिबानच्या गटांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच सरकार स्थापनेला उशीर होत आहे. मुल्ला बरादर सरकारचं नेतृत्त्व करणार असल्याचं याआधी सांगितलं गेलं होतं. मात्र आता मतभेदांमुळे सरकार स्थापनेस विलंब होत आहे.