अफगाणिस्तानमधील (Afghanistan) बिघडलेल्या परिस्थितीमुळे भारताने व्हिसाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी व्हिसाची नवीन श्रेणी जाहीर केली. यामध्ये अफगानिस्तानातून भारतात येण्यास इच्छुक असलेल्या अफगान नागरिकांना कमीतकमी वेळात व्हिसा दिला जाणार आहे. तालिबानने (Taliban) कब्जा केल्यानंतर दोन दिवसांतच ही घोषणा करण्यात आली आहे. (home ministry on Tuesday has created a new e-visa category – the e-Emergency X-Miscellaneous visa for Afghan nationals)
Afghanistan: अमेरिकेला एकच चूक नडली; तालिबानच्या मास्टरमाईंड बरादरला 2018 मध्ये सोडले तिथेच फसले
जे अफगानी नागरिक भारतात येण्यासाठी अर्ज करतील त्यांचा अर्ज कमीत कमी वेळात मार्गी लावण्याचे काम केले जाणार आहे. गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अफगानिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता व्हिसाच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. यानंतर फक्त अफगानिस्तानसाठी नवीन पर्याय देण्यात आला आहे. यानुसार अफगान नागरिकांना भारतात येण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा देण्यात येणार आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, या व्हिसाचे नाव ई-आपत्कालीन व्हिसा ठेवण्यात आले आहे.
Afghanistan: तालिबानींनी जत्रा भरवली! काबुल मिळताच पार्कमध्ये घुसले, मौजमस्ती सुरु; Video व्हायरल
तालिबानच्या भीतीने सोमवारी हजारो अफगानी नागरिक काबुल विमानतळावर जमले होते. त्यांना काहीही करून देश सोडायचा होता. अमेरिकन सैन्याच्या जम्बो विमानात 800 हून अधिक लोक दाटीवाटीने बसले होते. तर काही जण विमानाच्या बाहेरील भागावर बसले होते. यामुळे विमानाने उड्डाण करताच तिघांचा पडून मृत्यू झाला. अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, गोंधळामुळे एकूण 7 लोकांचा मृत्यू झाला आहे.
... म्हणून विमानाच्या मागे धावले अफगानी नागरिक, पसरली होती मोठी अफवाकाबुल विमानतळावर अफगाणिस्तानच्या नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. जो-तो केवळ विमानात बसण्यासाठी गर्दी करत होता. अमेरिकन सैन्य दलाचे हे विमाना काबुलमधून अमेरिकेला जाणार होते. येथून उड्डाण केलेल्या अमेरिकेच्या विमानाची क्षमता १३४ प्रवाशांची होती. मात्र, त्यात प्रत्यक्षात ८०० जण होते. अमेरिकन हवाई दलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर विमानाचे फोटो आणि व्हिडीओ कालच सर्वांनी पाहिले. विमान धावपट्टीवरून निघत असताना शेकडो लोक त्याच्या आसपास धावत होते. विमानाला लटकून प्रवास करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. याच प्रयत्नात काही जणांना जीव गेला. आता याच विमानाच्या आतल्या भागातील फोटो प्रसिद्ध झाले आहेत.