शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

Afghanistan Crisis: जो बायडेन आणि अश्रफ घानी यांच्यातील अखेरचे संभाषण आले समोर, १४ मिनिटांच्या चर्चेत झाले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 1:23 PM

Afghanistan Crisis Update: अश्रफ घानी सरकार कोसळण्याआधी जो बायडन आणि अश्रफ घानी यांच्यात झालेल्या अखेरच्या संभाषणाबाबतची माहिती समोर आली आहे. तसेच १४ मिनिटे चाललेल्या या चर्चेमधून अनेक धक्कादायक गौप्यस्फोट झाले आहेत.

वॉशिंग्टन - गेली २० वर्षे अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून असलेले अमेरिकेचे सैन्य परवा माघारी परतले. त्याबरोबरच दीर्घकाळापासून सुरू असलेल्या युद्धाची समाप्ती झाली. (Afghanistan Crisis) मात्र अमेरिकेने अफगाणिस्तानमधून पूर्णपणे माघार घेण्यापूर्वीच तालिबानने देशातील अश्रफ घानी सरकार उलथवून अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केला होता. दरम्यान, अश्रफ घानी सरकार कोसळण्याआधी जो बायडन आणि अश्रफ घानी यांच्यात झालेल्या अखेरच्या संभाषणाबाबतची माहिती समोर आली आहे. तसेच १४ मिनिटे चाललेल्या या चर्चेमधून अनेक धक्कादायक गौप्यस्फोट झाले आहेत. (The last conversation between Joe Biden and Ashraf Ghani came to light) 

अश्रफ घानी आणि जो बायडन यांच्यात १४ मिनिटे चाललेल्या चर्चेमध्ये लष्करी मदत आणि राजकीय रणनीतीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही नेत्यांमध्ये तालिबानकडून अफगाणिस्तावर होणाऱ्या कब्ज्यााबाबत चर्चा झाली नाही. सूत्रांनी ओळख न जाहीर करण्याच्या अटीवर दिलेल्या ट्रान्स्क्रिप्टचे परीक्षण करून रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. या संभाषणामध्ये बायडन यांनी जर घनी यांनी तालिबानविरोधात हल्ल्याची काही योजना आखली तर अमेरिका त्याला सहकार्य करेल, असे सांगितले होते.  तसेच अफगाणिस्तानची लष्करी रणनीती तयार करा. तसेच या योजनेचे वॉरियर तत्कालीन संरक्षणमंत्री जनरल बिस्मिल्ला खान मुहम्मदी यांना बनवा, असा सल्ला बायडन यांनी घानी यांना दिला होता. तसेच मी लष्करासी संबंधित व्यक्ती नाही. त्यामुळे मी तुम्हाला लष्करी रणनीतीबाबत सल्ला देऊ शकत नाही, असेही बायडन म्हणाले होते. त्याबरोबरच तालिबानकडून अफगाणिस्तानमधील एकेका जिल्ह्यावर होत असलेल्या कब्जाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमधील राजकारण्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित करून आपली भूमिका जगासमोर मांडावी, असा सल्लाही बायडन यांनी दिला होता. बायडेन यांनी अफगाणी सैन्याचेही कौतुक केले होते. तुमच्याकडे खूप चांगले ३ लाख सैन्य आहे. ते तालिबानच्या ७० ते ८० हजार योद्ध्यांशी लढण्यामध्ये सक्षम आहे, असे ते म्हणाले होते. तर अश्रफ घानी यांनी बायडन यांना सांगितले होते की, आमच्यावर तालिबानच हल्ला करत नाही आहे, तर पाकिस्तानही पूर्ण योजनेसह आमच्यावर आक्रमण करत आहे. त्यांनी १० ते १५ हजार दहशतवादी येथे पाठवले आहेत. जेव्हा लष्करी स्थिती संतुलित असेल तेव्हाच आम्ही शांतता प्रस्थापित करू. यावेळी बायडन यांनी घानी यांना माजी राष्ट्रपती हमिद करझई यांना सोबत घेण्याचा सल्ला दिला. मात्र घानी याबाबत म्हणाले की, त्यांनी तसे प्रयत्न केले आहेत. मात्र करझई मला अमेरिकेचा नोकर म्हणून टीका करतात, अशी तक्रार घानी यांनी केली होती. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानJoe Bidenज्यो बायडनUnited Statesअमेरिका