अमेरिकन सैन्याने काढता पाय घेतल्यानंतर जवळपास संपूर्ण देश ताब्यात घेणाऱ्या तालिबाननंअफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलवरही आक्रमण केलं होतं. दरम्यान, तालिबानचे दहशतवादी काबुलच्या सीमेमध्ये घुसले आहेत. तसेच या दहशतवाद्यांनी सर्व बॉर्डर क्रॉसिंगवर कब्जा केला असल्याचं यापूर्वी एपीने प्रसारित एका अफगाण अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितलं होतं. दरम्यान, आता अफगाणिस्तानचेराष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली आहे. टोलो न्यूजनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. दरम्यान, अशरफ गनी हे तझाकिस्तानला रवाना झाल्याची माहिती सरकारमधील एका मंत्र्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
दरम्यान, अशरफ गनी यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्या नेत्यांनी देश सोडला आहे याची माहिती समोर आलेली नाही. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देशाच्या राजकीय नेतृत्वाला सध्याचे संकट सोडवण्यासाठी अधिकृत केलं होतं. अशा परिस्थितीत, त्यांच्या देश सोडण्याबद्दल आधीच चर्चा सुरू होती, अशी माहिती कार्यवाहक संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह अहमदी यांनी यापूर्वी दिली होती. तालिबाननं रविवारी काबुलवरही ताबा मिळवला होता. तालिबाननं तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा काबुलवर आपली सत्ता प्रस्थापित केली. २००१ मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तालिबानला काबुल सोडून पळ ठोकावा लागला होता.
२० वर्षांपासून सरकारसोबत संघर्ष२००१ पासूनच तालिबान अमेरिका समर्थित सरकारशी संघर्ष करत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा उदयदेखील अमेरिकेच्या प्रभावामुळेच झाला होता. आता तोच तालिबान अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरला आहे. १९८० च्या दशकात जेव्हा सोव्हियत संघानं अफगाणिस्तानमध्ये फौज उतरवली होती, तेव्हा अमेरिकेनंच त्या ठिकाणी असलेल्या मुजाहिद्दीनांना हत्यारं आणि प्रशिक्षण देत युद्धासाठी प्रवृत्त केलं होतं. परंतु त्यानंतरही ना सोव्हियत संघानं हार मानली आणि परत गेले, परंतु अफगाणिस्तानमध्ये एका कठ्ठरपंथी संघटनेचा जन्म झाला.