काबूल : तालिबाननेअफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर याठिकाणी अचानक बॉम्बस्फोट होण्याच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा काबूल विमानतळाजवळ रॉकेट्सचा आवाज ऐकू आला आहे.
वृत्तसंस्था एएफपीने सोमवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर अनेक रॉकेट्स उडताना ऐकू आल्याचा दावा करत आपल्या कर्मचाऱ्यांचा हवाला दिला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मिसाइल डिफेंसिव सिस्टम अॅक्टिव्ह झाल्याचे आवाज ऐकले. विमानतळाजवळ धूर दिसून आला, असे काबूल विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांनी सांगितले. तर इंटरसेप्टर्सनी रॉकेट्स खाली पाडल्याचे समजते.
अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात सहा मुलांचा मृत्यूआयसिसच्या दहशतवाद्यांना संपविण्याच्या तसेच संभाव्य हल्ले रोखण्यासाठी रविवारी अमेरिकेने काबूलमध्ये ड्रोन हल्ले केले. यामध्ये सहा मुलांसह ९ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अमेरिकेच्या बायडेन सरकारवर टीका होऊ लागली आहे. हे सर्व मृत हे एकाच कुटुंबातील होते.
१ ऑगस्टनंतर अमेरिकेला अधिकार नाहीत : तालिबानअमेरिकेला ३१ ऑगस्टनंतर अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक करण्याचा अधिकार राहणार नाही. यापुढे असा प्रयत्न रोखण्यात येईल, असे तालिबानने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने दोन दिवसांमध्ये दोन एअर स्ट्राईक केले आहेत.
...तर आणखी एअर स्ट्राइक करू : बायडेनबायडेन यांनी आणखी एअर स्ट्राईक करण्याचे स्पष्ट केले आहे. काबूल विमानतळावरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १३ अमेरिकन सैनिकांचे पार्थिव अमेरिकेतील डेलवेअर येथे दाखल झाले. बायडेन यावेळी स्वत: उपस्थित होते.