काबूल - अफगाणिस्तानच्या सत्तेवक कब्जा केल्यानंतर तालिबाबने हळुहळू आपले क्रूर फर्मान काढण्यास सुरुवात केले आहे. शनिवारी तालिबानींनी अफगाणी नागरिकांना त्यांच्याकडील सरकारी मालमत्ता, वाहने आणि हत्यारे एका आठवड्याच्या आत जमा करण्याचे आदेश दिले आहे. (Afghanistan Crisis)टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी एक वक्तव्य प्रसिद्ध करत लोकांना सरकारी मालमत्ता, हत्यारे, दारूगोळा आणि वाहने सोपवण्यास सांगितले आहे. तसेच जे अफगाणी नागरिक सरकारी मालमत्ता, हत्यारे आणि दारू-गोळा तालिबानी दहशतवाद्यांकडो सोपवणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. (Taliban issues new order to Afghan citizens, "Seize government property, vehicles, weapons within a week, otherwise face harsh action")
याबाबत तालिबानने सांगितले की, काबुलमध्ये ज्यांच्याजवळ साधनसंपत्ती, हत्यारे, दारूगोळा आणि अन्य सामान आहे, त्यांनी एका आठवड्याच्या आत हे सामान इस्लामिक अमिराती्या संबंधित विभागांना सोपवावे, अशी सूचना देण्यात येत आहे. असे न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. तत्पूर्वी तालिबाबने इमामांना शुक्रवारच्या नमाजच्या दिवशी विशेष उपदेश देण्याचा सल्ला दिला होता. सत्तेने दिलेल्या आदेशांचे पालन करण्याची सूचना त्यांनी करावी, असे या सल्ल्यात म्हटले होते.
दरम्यान, तालिबानच्या कब्जानंतर अफगाणिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोग देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र तालिबानी त्यांना रोखून ठेवत आहेत. विमानतळावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर तालिबानी दहशतवादी तैनात आहेत. अफगाण नागरिकांना विमानतळावर पोहोचून दिले जात नाही आहे. कुठल्याही अफगाणी नागरिकांना देश सोडू देणार नाही, असे तालिबानने स्पष्ट केले आहे. तालिबानने विमानतळावर जाणारे सारे सत्ये बंद केले आहेत. तसेच केवळ परदेशी नागरिकांनाच विमानतळावर जाण्याची परवानगी दिली जात आहे.