शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Afghanistan Crisis: दोनशे भारतीय ‘एअरलिफ्ट’, तालिबान्यांच्या तावडीतून सुटका; संघटना म्हणते, आम्ही सर्व परदेशी नागरिकांना सुरक्षित ठेवू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 5:55 AM

Afghanistan Crisis: काबूलमध्ये २०० भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते.

नवी दिल्ली : तालिबानने ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे काबूलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना एअरलिफ्ट करण्यास भारताने सुरुवात केली आहे. भारतीय वायुसेनेची दोन विमाने २०० भारतीयांना घेऊन मायदेशी परत आली. ही विमाने गुजरातच्या जामनगर येथे दाखल झाली. त्यात भारतीय राजदूत रुद्रेंद्र टंडन हेदेखील भारतात परतले आहेत. काबूलचे विमानतळ जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत एअर इंडियाने काबूलहून विशेष उड्डाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काबूलमध्ये २०० भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. त्यांना मायदेशी आणण्याची तयारी सुरू असताना तालिबानने हवाई सीमा बंद केल्याने अडचण निर्माण झाली होती.

तोवर सेवा सुरूच राहणारभारताने अफगाणिस्तानातून राजदूतांसह दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी १९९६ नंतर पुन्हा एकदा तेथील दूतावास बंद झाला आहे. मात्र, अद्यापही काही भारतीय नागरिक अफगाणिस्तानात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी एअर इंड‍ियाने विशेष विमाने उडविण्याचा निर्णय घेतला आहे. काबूल येथील विमानतळ सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. विमानतळ जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत एअर इंडियातर्फे विशेष विमाने उडविणार असल्याची माहिती रुद्रेंद्र टंडन यांनी दिली.

पासपोर्टअभावी अनेक कामगार अडकलेउत्तर प्रदेशातील काही कामगार काबूलमधील एका कारखान्यात अडकल्याची माहिती आहे. त्यांचे पासपोर्ट कंपनीच्या मालकाने ताब्यात घेतल्याचे या कामगारांनी सांगितले असून, आपल्याला लवकरात लवकर तेथून बाहेर काढण्याची विनंती या कामगारांनी केली. 

भारतीयांना असे काढले बाहेरकाबूलचे विमानतळ अमेरिकन सैन्याच्या ताब्यात आहे. त्यांनी विमानतळावरील परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर विमान वाहतूक सुरू झाली. त्यानंतर अखेर वायुसेनेची दोन ‘सी-१७’ विमाने मंगळवारी सकाळी काबूलमध्ये दाखल झाली. दूतावासातील कर्मचारी, सुरक्षा जवान, तसेच काही पत्रकारांना घेऊन हे विमान मायदेशी परतले. तालिबानने ठिकठिकाणी चेकपॉइंट उभारले आहेत. त्यामुळे भारतीयांना दूतावासातून विमानतळापर्यंतचे अवघे १० किलोमीटरचे अंतर पार करण्यात मोठे अडथळे आल्याची माहिती टंडन यांनी दिली.

प्रथमच उपराष्ट्रपती सालेह यांनी तालिबानविरोधात थोपटले दंडतालिबानपुढे शरणागती पत्करून राष्ट्रपती अशरफ घनी यांनी पलायन केले असतानाच प्रथमच उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबानविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले. राज्यघटनेचा आधार देऊन त्यांनी ही घोषणा केली. कोणत्याही स्थितीत तालिबान्यांसमोर गुडघे टेकणार नाही, अशी भूमिका त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केली. तालिबानला फार प्रतिकाराविना जवळपास सर्व प्रांत काबीज करता आले. काबूलमध्येही त्यांना सहज प्रवेश मिळाला. मात्र, सालेह यांच्या भूमिकेमुळे नव्याने सत्तासंघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान