शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

Afghanistan Crisis : अफगाणमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचा संघर्ष, तालिबानच्या सशस्त्र चेक पॉइंटमुळे अडथळे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 6:24 AM

Afghanistan Crisis : काबूलसह अनेक  ठिकाणी तालिबानने सशस्त्र चेक पॉइंट उभारले आहेत. त्यामुळे लोकांना विमानतळावर पोहोचायला अतिशय अडथळे निर्माण झाले आहेत.

वॉशिंग्टन : तालिबानने ताबा मिळविल्यानंतर अमेरिकेने तेथून आपल्या तसेच देश सोडून बाहेर जाणाऱ्या अफगाण नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या प्रयत्नांची गती मंदावली आहे. काबूल विमानतळापर्यंत येण्याच्या मार्गात ठिकठिकाणी तालिबानी बंडखोरांनी उभे केलेले सशस्त्र चेक पॉइंट तसेच कागदोपत्री अडचणींमुळे नागरिकांना वेगाने एअरलिफ्ट करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टच्या डेडलाइनपर्यंत हजारो नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे शक्य होणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. काबूलसह अनेक  ठिकाणी तालिबानने सशस्त्र चेक पॉइंट उभारले आहेत. त्यामुळे लोकांना विमानतळावर पोहोचायला अतिशय अडथळे निर्माण झाले आहेत. पाश्चिमात्य देशांसोबत यापूर्वी काम केलेल्यांना भीती आहे, की तालिबान त्यांना लक्ष्य करेल. कोणतीही कागदपत्रे नसलेले शेकडो अफगाण नागरिक विमानतळाबाहेर धडकत आहेत. त्यामुळे योग्य परवानगी आणि कागदपत्रे असलेल्या नागरिकांचीही कोंडी झाली आहे. त्यातच चेक पॉइंटवर अनेक अशिक्षित बंडखोर ठेवल्यामुळे अनेकांना कागदपत्रे वाचताच आली नाही. परिणामी अशा बिकट परिस्थितीतून नागरिकांना बाहेर काढण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.  अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारीसाठी ३१ ऑगस्टची डेडलाइन आहे. अशा अराजकतेच्या परिस्थितीत अजूनही हजारो नागरिक अफगाणिस्तानात अडकले आहेत. त्यामुळे या डेडलाइनचे काय होणार आणि त्यानंतर काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

५२०० अमेरिकन सैनिक तैनातपेंटागॉनने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार काबूलमध्ये अमेरिकेचे केवळ ५२०० लष्करी जवान तैनात आहेत. अमेरिकन लष्कराचे मेजर जनरल विल्यम टेलर यांनी पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती दिली. काबूल विमानतळ हे सुरक्षित असून, तेथून विमान उड्डाणेही घेत आहे, असेही टेलर यांनी सांगितले. 

आतापर्यंत सात हजार नागरिकांना हलविलेकाबूल विमानतळावरील जवळजवळ सहा हजार जणांना अमेरिकेच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलवण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले. ते म्हणाले, की या नागरिकांना लवकरच विमानाने हलवले जाईल. अमेरिकेच्या सी-१७ एस या विमानाने १२ फेऱ्यांमध्ये २००० जणांना सुरक्षितस्थळी हलवले असून, १४ ऑगस्टपासून एकूण ७००० जणांना सुरक्षितस्थळी हलविले.

प्रक्रिया गतिमान होणारनागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया लवकरच गतिमान होईल, असे पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, की कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रियादेखील वेगाने करण्याचे प्रयत्न आहेत. दररोज पाच ते नऊ हजार नागरिकांना बाहेर काढता येईल, एवढे विमाने उपलब्ध आहेत.

१६० ऑस्ट्रेलियन व अफगाण नागरिकांना काढले बाहेर-  ऑस्ट्रेलियाने पाठविलेल्या तिसऱ्या विमानाद्वारे १६० ऑस्ट्रेलियन आणि अफगाण नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली. -  गेल्या २० वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाची मदत करणाऱ्या ६० अफगाण नागरिकांना संयुक्त अरब अमिरात येथे पाठविण्यात आले तर ९४ लोकांना घेऊन येणारे एक विमान पर्थ येथे उतरले.  मात्र, काबूलव्यतिरिक्त अफगाणिस्तानातील इतर नागरिकांना बाहेर काढता आले नाही, असेही मॉरिसन म्हणाले. 

टॅग्स :TalibanतालिबानAmericaअमेरिकाAfghanistanअफगाणिस्तान