तालिबान्यांनीअफगाणिस्तानवर कब्जा मिळविल्यानंतर त्या देशात अराजक माजले आहे. अफगाणी नागरिक स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी कशी वणवण करत आहेत, हे साऱ्या जगाने दूरचित्रवाणीवर पाहिले. या सर्व गदारोळात अफगाणिस्तानातभारताने केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचे भवितव्य काय, हा प्रश्न ठसठशीतपणे पुढे आला आहे.
आता काय होणार?तालिबानी राजवटीशी भारताचे संबंध कसे असतील, हे आताच ठामपणे सांगता येणे अशक्य आहे. भारताने कायमच अफगाणिस्तानला मदत केली आहे. तेथे अनेक विकासकामेही केली आहेत. मात्र, आता भारताला अफगाणिस्तानात मुक्त वाव असणे शक्य नाही. त्यातही चीनने तालिबानी राजवटीपुढे मैत्रीचा हात केल्याने अफगाणिस्तान चीनच्या कह्यात जाण्याची शक्यता आहे. इराकमधील चाबहार बंदराला जोडणारा रस्ता अफगाणिस्तानातूनच जातो. या रस्ते कामावरही परिणाम होणार आहे. एकूणच भारताचे आर्थिक आणि भूराजकीय नुकसान होणार आहे.
दाेन्ही देशांतील करारउभय देशांत द्विपक्षीय व्यापार उदिमाचे करार झाले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये १०,३८७ कोटी रुपये मूल्याचा व्यापार झाला. याच कालावधीत भारताने अफगाणिस्तानात ६,१२९ कोटी रुपयांची उत्पादने निर्यात केली. तर अफगाणिस्तानातून ३,७८३ कोटी रुपयांचा माल आयात मायदेशात आयात करण्यात आला.