शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

Afghanistan: अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबान्यांकडून हवेत गोळीबार करत आनंद साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 9:08 AM

Afghanistan: सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेचे शेवटचे विमान काबूल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर तालिबान्यांनी आनंद साजरा केला आहे.

१९ वर्षे, १० महिने आणि २५ दिवसांनंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तान सोडले. दोन दशकांच्या लढाईनंतर अमेरिका येथून परतली असून, हा मोठा पराभव मानला जात आहे. सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेचे शेवटचे विमान काबूल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर तालिबान्यांनी आनंद साजरा केला आहे. (Afghanistan: Last US aircraft leaves Kabul, Taliban indulge in celebratory gunfire)

काबूलच्या रस्त्यांवर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला आनंद साजरा केला. अमेरिकेने काबूल सोडल्यानंतर तालिबानने आता काबूल विमानतळ ताब्यात घेतले आहे. म्हणजे आता जर कोणाला देशाबाहेर जायचे असेल तर तालिबानच्या परवानगीनंतरच जाता येणार आहे. अफगाणिस्तानवर आता तालिबानचे पूर्णपणे नियंत्रण असणार आहे.

अफगाणिस्तानात २० वर्षांच्या युद्धानंतर विजयाचा आनंद साजरा करताना तालिबान्यांनी फटाके फोडत आकाशात गोळीबार केला. तालिबान्यांनी शेवटचे अमेरिकन विमान सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास रात्रीच्या आकाशात पाहिल्यानंतर त्यांच्या हवेत गोळीबार केला आणि फटाके उडवले.

अमेरिकन सैनिक बाहेर पडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य असलेला देश घोषित केला आहे. २० वर्षे चाललेल्या प्रदीर्घ युद्धानंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले आहे. अमेरिका परत गेल्यामुळे तालिबान खूप आनंदी आहे. अफगाणिस्तान आता पूर्णपणे मुक्त झाला आहे आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहे, असे तालिबानने म्हटले आहे. 

बायडेन यांनी आपल्या सैन्याचे आभारअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर भाष्य केले. जो बायडेन यांनी आपले सैन्य खतरनाक मोहिमेवरून परतण्यावर आभार मानले आहेत. ते म्हणाले की, गेल्या १७ दिवसांत आमच्या सैन्याने आजवरच्या अमेरिकी इतिहासातील सर्वात मोठे एअरलिफ्ट केले. आम्ही १.२ लाखांहून अधिक अमेरिकी नागरिक, सहकारी देशांचे नागरिक आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढले.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानAmericaअमेरिका