Afghanistan Earthquake | भारताचे शेजारील राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले. मिळालेल्या माहितीनुसार हे धक्के ६.१ रिश्टर स्केलचे होते. भूकंपामुळेअफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वित्तहानी नक्की किती झाली याची स्पष्ट कल्पना मिळालेली नसली तर सुमारे २५५ पेक्षाही अधिक लोक मृत्युमुखी पडले असल्याची माहिती असोसिएट प्रेसच्या हवाल्याने ANI ने दिले आहे. यूएस जिऑलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात होता.
पाकिस्तानातही जाणवले भूकंपाचे धक्के
पाकिस्तानी मीडियानुसार, इस्लामाबादसह इतर शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या आधी शुक्रवारीही पाकिस्तानमध्ये भूकंप झाला होता. त्यानंतर इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानमध्ये हे धक्के जाणवले. फैसलाबाद, अबोटाबाद, स्वात, बुनेर, कोहाट आणि मलकांडी येथेही हे धक्के जाणवले.
किती रिश्टर स्केलचा भूकंप घातक?
भूकंपाची कमाल तीव्रता अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. तथापि, रिश्टर स्केलवर ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप मध्यम धोकादायक मानला जातो. या स्केलवर 2 किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेच्या भूकंपाला सूक्ष्म भूकंप म्हणतात, जो बहुतेक जाणवत नाही. तर ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे घरांचे नुकसान होऊ शकते.