शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

Afghanistan Crisis : काबुल विमानतळावर उपासमारीचे संकट; 3000 रुपयांना पाण्याची बाटली तर 7500 रुपयांना जेवण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 9:34 AM

Afghanistan Crisis : काबुल विमानतळावर जेवण आणि पाण्याचे दर गगनाला भिडले आहेत.

काबुल : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर  (Afghanistan) कब्जा केल्यापासून या देशात सर्व काही बदलले आहे. येथील जास्तीत जास्त लोकांना कसेही करून देश सोडायचा आहे. अफगाणिस्तानमधून बाहेर जाण्याचा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे काबुल विमानतळ (Kabul Airport). येथील सुरक्षा अमेरिकन सैनिकांची आहे. काबुल विमानतळावर अफगाणिस्तान सोडू इच्छिणाऱ्या जवळपास अडीच लाख लोकांची गर्दी आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, भुकेने व्याकुळ असलेल्या लोकांना विमानतळावरच आपला जीव गमवावा लागत आहे.

दरम्यान, काबुल विमानतळावर जेवण आणि पाण्याचे दर गगनाला भिडले आहेत. याठिकाणी ४० डॉलर्स म्हणजेच ३,००० रुपयांना पाण्याची बाटली मिळत आहे. तर जेवणाच्या एका प्लेटसाठी १०० डॉलर्स म्हणजेच ७५०० रुपये खर्च करावे लागत आहेत. या विमानतळावर जे काही पाणी किंवा अन्न विकत घ्यायचे, त्यासाठी अफगाणिस्तानचे चलन घेतले जात नाही. तर फक्त डॉलर्समध्ये पेमेंट स्वीकारले जात आहे. त्यामुळे अफगाणी नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.  

विमानतळावर पोहोचण्यास ५ ते ६ दिवसांचा कालावधी अफगाणिस्तानातील लोकांचे म्हणणे आहे की, काबूलमधील घरातून विमानतळावर पोहोचण्यास ५ ते ६ दिवस लागले. कारण, शहरातून विमानतळापर्यंत तालिबान्यांचा पहारा आहे. तालिबानच्या गोळीबारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि हजारो लोकांची गर्दी ओलांडून विमानतळाच्या आत जाणे कठीण आहे. विमानतळाच्या आत गेलात तरी विमान मिळण्यास पाच ते सहा दिवस लागतात. फक्त बिस्किटं आणि मिठाई यावर दिवस काढावे लागत आहेत. खाण्या-पिण्याच्या या किंमतीमुळे  अडचणीत भर पडली आहे. अफगाणिस्तानची स्थिती अशी आहे की अनेक मुले पालकांशिवाय अफगाणिस्तान सोडत आहेत.

आतापर्यंत 20 जणांचा मृत्यूजेवण आणि पाण्याच्या वाढत्या किंमतीमुळे लोकांना भुकेल्या पोटावर उन्हात उभे राहण्यास भाग पडत आहे. त्यामुळे या लोकांचे शरीर कमकुवत होत असून आणि ते बेशुद्ध पडत आहेत. लोकांना मदत करण्याऐवजी तालिबान त्यांना घाबरवत आहे. मारहाण करत आहे. काबुल विमानतळाबाहेर झालेल्या गोंधळात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

८२,३०० लोकांना बाहेर काढण्यात आलेआतापर्यंत काबुलमधून ८२,३०० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. काबुलमध्ये सुमारे ६,००० अमेरिकन आढळले आहेत. त्यापैकी ४५०० लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तालिबानने अलीकडेच म्हटले आहे की, जर अमेरिकेने ३१ ऑगस्टपर्यंत आपले अभियान थांबविले नाही, तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात.

विमानतळाकडे जाणारे रस्ते अडविले तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी विमानतळाकडे जाणारे रस्ते अडवले आहेत. अफगाण नागरिकांना आता विमानतळावर जाता येणार नाही. त्या रस्त्यावरून विमानतळापर्यंत केवळ परदेशी नागरिकांनाच प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. तसेच, यापूर्वी काबुल विमानतळावर असलेल्या सर्व अफगाण नागरिकांनी घरी परतावे. अशा लोकांना तालिबानकडून शिक्षा होणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानfoodअन्न