शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

Afghanistan Taliban Crisis : काबुल विमानतळाबाहेर भीषण परिस्थिती; गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 2:33 PM

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी जमा होत आहे. याच दरम्यान आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे.

तालिबान्यांनीअफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते  विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. अशातच मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अफगाणिस्तानमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी जमा होत आहे. याच दरम्यान आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. काबुल विमानतळाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. 

काबुल विमानतळाबाहेर गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटीश लष्कराने याबाबतची माहिती दिली आहे. "अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती सुरक्षितरित्या हाताळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जे काही आवश्यक आहे ते केलं जात आहे" असं ब्रिटीश लष्कराने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. भारतीय हवाई दलाला मोठं यश आलं आहे. भारतीय हवाई दलाचं सी-17 विमान आज सकाळी काबुलहून 168 जणांना घेऊन भारतात दाखल झालं आहे. गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुसेनेचं हे विमान उतरलं आहे. याठिकाणी वायुसेनेकडून सर्व नागरिकांच्या उतरविण्यात आलं असून त्यांची सर्व काळजी वायुसेनेकडून घेतली जात आहे. यात अनेक लहान मुलं, महिला आणि अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. 

हाहाकार! काबुल विमानतळाच्या कुंपणावरून चिमुकल्यांना फेकताहेत महिला; जीव वाचवण्यासाठी धावपळ

तालिबान्यांच्या भीतीमुळे नागरिक देश सोडण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. अशातच काबूल विमानतळावर अमेरिकी, ब्रिटनचे सैनिक आणि अफगाण नागरिकांना वेगवेगळं करण्यासाठी तारेचं कुंपण घालण्यात आलं आहे. परंतु देश सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही अफगाणी महिला आपल्या लहान मुलांना तारेच्या कुंपणापलीकडे फेकताना दिसत आहेत. अशातच काही मुलं या कुंपणांमध्येच अडकून पडल्याचा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. काबूल विमानतळावर हताश नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक महिला आपल्या मुलांना घेऊन विमानतळावर धावताना दिसत आहेत. अफगाणी महिला आपली मुलं रेंजर तारांवरुन पलीकडे फेकत होत्या. हे दृश्य खरोखरच भयानक होतं. सैनिकांनी आपल्या मुलांना घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र यातील काही मुलं तारांमध्येच अडकून पडली असल्याचं म्हटलं आहे. 

परिस्थिती गंभीर! Video व्हायरल झालेल्या 'त्या' बाळाचं नेमकं काय झालं?; जाणून घ्या, 'सत्य'

अफगाणिस्तानमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी जमा होत आहे. येथे ब्रिटीश आणि अमेरिकन सैनिकही भावूक झाले आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अशी अनेक दृश्य पाहून सैनिकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. असाच एक काळजात चर्र करणारा व्हिडीओ आता समोर आला आहे. आपल्या लेकाचा जीव वाचवण्यासाठी हतबल आईने बाळाला सैनिकाकडे सोपवलं. त्याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सैनिकाकडे सोपवलेल्या बाळाचं नेमकं नंतर काय झालं? अशा प्रश्न अनेकांना पडला होता. यावर आता अमेरिकन सैन्याने ते बाळ पुन्हा त्याच्या वडीलांकडे सोपवल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओशी संबंधित माहिती दिली आहे. "काबूल विमानतळावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अमेरिकी लष्कराच्या अधिकाऱ्याने एका अफगाणी बाळाला तारेच्या कुंपणावरुन घेतले होते. आता त्या बाळाला त्याच्या वडिलांकडे पुन्हा सोपवण्यात आले असून ते विमानतळावर सुरक्षित आहे" अशी माहिती अधिकाऱ्यांनी आता  दिली आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानDeathमृत्यूAirportविमानतळ