अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. परंतु अशा परिस्थितीत अशरफ गनी यांच्या देश सोडल्यानं अनेक नागरिक नाराज झाले आहे. भारतात आलेल्या एका अफगाण विद्यार्थ्यांनही यानंतर आपलं दु:ख व्यक्त केलं.
"राष्ट्राध्यक्ष अशरफ गमी अशा वेळी देश सोडून गेले, हे अतिशय बेजबाबदार पणाचं वर्तन आहे. त्यांच्या या कृत्यामुळे प्रत्येक अफगाणी नागरिकाला दु:ख झालं आहे. आम्हाला त्यांच्याकडून अनेक अपेक्षा होत्या," असं विद्यार्थ्यांनं सांगितलं.
"अफगाणिस्तानच्या बहुतांश भागात शांतता आहे. जवळपास अनेक राजकीय लोकांनी काबुल सोडलं. २०० जण दिल्लीला आले आहेत. मला असं वाटतंय हे नवं तालिबान आहे. ते महिलांनादेखील काम करण्याची परवानगी देतील,"अशी प्रतिक्रिया अफगाण राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार रिझवानुल्ला अहमदझई यांनी दिल्लीला आल्यानंतर दिली.
तालिबान आम्हालाही मारू शकतो"जगानं अफगाणिस्तानला वेगळं सोडलं यावर विश्वास बसत नाही. त्या ठिकाणी आमचा मित्रपरिवार आहे, त्याचा खून होऊ शकतो. तालिबान आम्हालाही मारू शकते. आमच्या महिलांना आथा त्या ठिकाणी अधिक अधिकार मिळणार नाही," अशी प्रतिक्रिया भारतात आलेल्या एका महिलेनं दिली.
गनी यांची भावूक पोस्ट"माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते. तालिबानने मला हटवले आहे. काबुलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असं गनी यांनी म्हटलं आहे.
काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतं"मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असं घनी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.