शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan: तालिबानींनी जत्रा भरवली! काबुल मिळताच पार्कमध्ये घुसले, मौजमस्ती सुरु; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 11:24 IST

Afghanistan crisis, Market closed in First day of Taliban capture: रविवारी तालिबानने राजधानी काबुलवर ताबा मिळवला. तालिबानला न लढताच काबुल मिळाले. राष्ट्राध्यक्ष गनी यांनी काबुवासियांच्या जिवाचा हवाला देत पलायन केले.

अफगानिस्तान (Afghanistan) मध्ये 20 वर्षांनी पुन्हा एकदा तालिबानने (Taliban) कब्जा केला आहे. रविवारी तालिबानने राजधानी काबुलवर ताबा मिळवला. तालिबानला न लढताच काबुल मिळाले. राष्ट्राध्यक्ष गनी यांनी काबुवासियांच्या जिवाचा हवाला देत पलायन केले. यानंतर लढाईच जवळपास संपल्याने तालिबानचे दहशतवादी काबुलच्या एम्यूजमेंट पार्कमध्ये मौजमस्ती करताना दिसले. याचे व्हिडीओ  (Taliban Video) व्हायरल झाले आहेत. (A day after taking over Kabul, Taliban enjoy at amusement park.)Afghanistan: अमेरिकेला एकच चूक नडली; तालिबानच्या मास्टरमाईंड बरादरला 2018 मध्ये सोडले तिथेच फसलेएम्यूजमेंट पार्कमध्ये तालिबानींचे मस्ती करतानाचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत तालिबानी हातात बंदुका घेऊन गो कार्टिंग करताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडीओत हे तालिबानी घोड्यांवर (खेळण्यातल्या) बसून मौजमस्ती करताना दिसत आहेत. 

Afghanistan: तालिबानने मागविलेल्या 15 वर्षांवरील मुलींच्या यादीचे काय? महिलांसमोर सेक्स गुलाम होण्याचे संकट

काबुल ताब्यात घेतल्यानंतर आता तालिबानच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दोहामध्ये अफगानिस्तानच्या भविष्याबाबत चर्चा सुरु आहे. तालिबान बदलल्याचा जरी दावा करत असला तरी देखील 20 वर्षांपूर्वीच्या तालिबानची दहशत कायम असल्याने हजारो अफगानींना देश सोडायचा आहे. यासाठी जिवाच्या आकांताने हे लोक काबुल विमानतळाबाहेर जमले आहेत. एकीकडे हे लोक चिंतेत असताना तालिबानी दहशतवादी मौजमस्ती करत आहेत. 

रविवारी तालिबानने काबुलवर कब्जा मिळविला. सोमवार हा तालिबानचा काबुलमधील पहिला दिवस होता. टोलो न्यूजनुसार एका दिवसातच अफगानिस्तानमध्ये मोठा बद झाला. दुकाने, उद्योग, सरकारी कार्यालये बंदच होती. वाहतुकीवरही परिणाम जाणवला. महिला देखील सार्वजनिक ठिकाणी कमी दिसल्या. 

सरकारी कार्यालये, संस्था लवकरात लवकर सुरु केल्या जाव्यात. लोक आपली कामे लवकरात लवकर सुरु करु शकतील, अशी मागणी लोकांकडून होत आहे. शहरात बेकायदा पद्धतीने बंदुका घेऊन दहशतवादी फिरत आहेत. यावर चिंता व्यक्त करताना पुढील काळात कमी वेळा घरातून बाहेर पडणार असल्याचेही काही लोकांनी सांगितले.  

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान