काबूल - अफगाणिस्तानवर ताब्यात मिळविल्यानंतर आता तालिबानने आपल्या हेतूसाठी इस्लामचा वापर करायलाही सुरुवात केली आहे. तालिबानने देशातील सर्व इमामांना, सरकारच्या नियमांचे पालन कसे करावे, हे शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान लोकांना सांगायला सांगितले आहे. गुरुवारी काबूल विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 100 जनांचा मृत्यू झाला. यानंतर तालिबानने हा निर्णय घेतला आहे. (Afghanistan taliban using islam for agenda now says imams to preach about obedience at friday prayers)
यापूर्वी, तालिबानने अफगाणिस्तानच्या इमामांना आदेश दिला होता, की त्यांनी आपल्या विरोधात येणाऱ्या सर्व बातम्यांकडे दुर्लक्ष करत, शुक्रवारच्या नमाज निमित्त जनतेला योग्य माहिती द्यावी. तसेच, अफगाणिस्तान सोडू नये, असेही सांगावे.
पंतप्रधान मोदीचं 'ते' वक्तव्य तालिबानला चांगलंच झोंबलं; अशी आली प्रतिक्रिया
तालिबानने इमामांना सांगितले, की आपण आमच्याविरोधात सुरू असलेल्या नकारात्मक प्रचाराचा प्रतिकार करा आणि लोकांना देश सोडण्यापासून रोखा. खरे तर, तालिबान आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच ते इमामांचाही उपयोग करून घेत आहेत. तालिबानला अफगाणिस्तानात संपूर्ण इस्लामिक शासन हवे आहे आणि त्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. गुरुवारीच अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या विमानतळावर भीषण दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 13 अमेरिकन सैनिकांसह जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला आहे.
या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट-खोरासनने घेतली आहे. स्फोट झाला तेव्हा, म्हणजेच गुरुवारी काबूल विमानतळावर हजारो लोक उपस्थित होते. याच वेळी आत्मघाती हल्लेखोर कंबरेला स्फोटके लावून आत आला होता आणि त्याने स्वत:च उडवले. विशेष म्हणजे तालिबानच्या माघारीमुळे अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले जाण्याची भीती आहे. विशेषतः महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रचंड निर्बंध लादले जाऊ शकतात.