तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर अमेरिका आपल्या अधिकाऱ्यांना आणि नागरिकांना संकटग्रस्त अफगाणिस्तानातून बाहेर काढत आहे. यासाठी अमेरिकेकडून सातत्याने बचावकार्य चालवले जात आहे. तालिबान्यांनी काबूल ताब्यात घेतल्यापासून शहरात पळापळीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. लोक अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी काबूल विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. काबुल विमानतळावर सध्या अमेरिकन सैन्याचेच नियंत्रण आहे. अशात अफगाणिस्तानचेही अनेक लोक अमेरिकेत जात आहेत. यामुळे तालिबान भडकला आहे. तसेच त्यांनी थेट अमेरिकेलाच इशारा दिला आहे.
महासंकट! तालिबानी दहशतनाद्यांनी अमेरिकेची शस्त्रास्त्रे लुटली, भारताआधी 'या' दैशात घालू शकतात थैमान
टोलोन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने अफगाण नागरिकांना देश सोडण्यासाठी प्रोत्साहित करू नये, असे तालिबानचे प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद यांनी म्हटले. तसेच, तालिबान पंजशीरमधील समस्या शांततेने सोडवण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही ते म्हणाले.
सीआयएच्या संचालकाची तालिबानी नेत्यासोबत काबूलमध्ये गुप्त बैठक
31 ऑगस्टपर्यंत अमेरिकेच्या माघारीची शक्यता कमी - अमेरिका 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तान सोडण्याची शक्यता कमी आहे. तालिबानने अमेरिकेला दिलेल्या मुदतीत अफगाणिस्तान सोडण्याचा अल्टिमेटम दिला आहे. यावर, बोलताना अमेरिकन गुप्तचर संस्थेचे प्रमुख अॅडम शिफ म्हणाले, अफगाणिस्तानातून 31 ऑगस्टपर्यंत सैन्य पूर्णपणे परत घेण्याची शक्यता फार कमी आहे. विशेष स्थलांतरित व्हिसा अर्जदार असलेल्या अमेरिकन नागरिकांना अजूनही सुरक्षितपणे बाहेर काढायची आवश्यक आहे. इतरांमध्ये अफगाणिस्तान प्रेसचे सदस्य, नागरी नेते, महिला नेते यांचा समावेश आहे. हे सर्व महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण केले जाऊ शकते, याची कल्पना करणे माझ्यासाठी कठीण आहे. हजारो अमेरिकन नागरिक, अफगाण दुभाषक आणि त्यांचे कुटुंबिय यांना काबूलमधून बाहेर काढणे बाकी आहे," असेही शिफ म्हणाले.
तालिबानची सत्ता स्थापनेची तयारी सुरू -तालिबाननंअफगाणिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानातील दुसऱ्या पत्रकार परिषदेत तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्ला मुजाहिदनं पुढील योजना सांगितल्या आहेत. तो म्हणाला की, सरकार स्थापनेवर सध्या चर्चा सुरू आहे. मुजाहिदनं सांगितल्यानुसार, काही सरकारी कार्यालयांमध्ये कामं सुरू झाली असून काही अधिकाऱ्यांची नेमणूकदेखील करण्यात आली आहे. तसेच, उद्यापासून अफगाणिस्तानातील सर्व बँका उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.