शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

Afghanistan Updates : तालिबान लवकरच करणार आपल्या राज्याची घोषणा; अफगाणिस्तानला देणार असं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 12:08 AM

तालिबानी (Taliban) दहशतवादी काबूलमध्ये घुसले आहेत. त्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आहे. तसेच आता तालिबान लवकरच संपूर्ण अफगाणिस्तानवर आपल्या राज्याची औपचारिक घोषणा करणार आहे.

काबुल - अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडताच तालिबानी (Taliban) दहशतवादी काबूलमध्ये घुसले आहेत. त्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आहे. तसेच आता तालिबान लवकरच संपूर्ण अफगाणिस्तानवर आपल्या राज्याची औपचारिक घोषणा करणार आहे. एपी या वृत्तसंस्थेने तालिबानच्या एका नेत्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, हा दहशतवादी समूह राष्ट्रपती भवनातून लवकरच 'इस्लामिक एमिरेट ऑफ अफगानिस्तान'ची घोषणा करेल. तालिबानची राजवट असताना सप्टेंबर 2001पर्यंत हेच देशाचे नाव होते. तालिबानी नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एपीला ही माहिती दिली. कारण, त्याला माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नाही. (Afghanistan Updates Taliban to announce its dominion soon)

काबुल एअरपोर्टवर आग, USचा आपल्या नागरिकांना सल्ला  -दरम्यान, काबूल विमानतळावर आग लागल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी लपण्याचा सल्ला दिला आहे. अफगाणिस्तानच्या राजधानीत सुरक्षिततेची स्थिती झपाट्याने बदलत असल्याचे काबूलमधील अमेरिकन दूतावासाने रविवारी एका सुरक्षा अलर्टमध्ये म्हटले आहे. यात विमानतळांचाही समावेश आहे, त्यामुळे लोकांनी सुरक्षित आणि सतर्क राहावे. 

राष्ट्रपती भवनावर तालिबानचा कब्जा -अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावर कब्जा केल्याचा दावा तालिबानच्या कमांडर्सनी केला आहे. मात्र, अद्याप अफगाण सरकारकडून यासंदर्भात पुष्टी करण्यात आलेली नाही. याचवेळी, अफगाणिस्तानात सत्ता हस्तांतरणासाठी कुठलेही अंतरिम सरकार बनविण्यात येणार नाही, असेही तालिबानने म्हटले आहे. तसेच, आपण अफगाणिस्तान पूर्णपणे नियंत्रणात घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला - दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली आहे. टोलो न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. दरम्यान, अशरफ गनी हे तझाकिस्तानला रवाना झाल्याची माहिती सरकारमधील एका मंत्र्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. तालिबान तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा काबुलवर आपली सत्ता प्रस्थापित करत आहे. 2001 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तालिबानची सत्ता गेली होती.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादीTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाAmericaअमेरिकाTalibanतालिबान