अमेरिकेच्या सैन्याने काबूल विमानतळावरून आज काढता पाय घेतला. अशाप्रकारे अमेरिकेने (America) अफगाणिस्तानातील आपली उपस्थिती संपविली. एकीकडे तालिबानी (Taliban) दहशतवाद्यांकडे अमेरिकेची खतरनाक शस्त्रास्त्रे असताना काबूल विमानतळावर मोठ्या प्रमाणावर आणखी काही रॉकेट, आर्टिलरी, मोर्टारसह 73 विमाने अमेरिकेने मागे सोडली आहेत. ही शस्त्रे खूप खतरनाक आणि युद्धासाठी महत्वाची आहेत. (America left behind Morter, Rockets and weapons on Kabul Airport.)
Afghanistan: तालिबानचा पंजशीरच्या पाठीत वार; अमेरिका जाताच भीषण हल्ला
आता अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान (Afghanistan) सोडले आहे, मग ही शस्त्रे, विमाने तालिबानच्या (Taliban) ताब्यात जाणार आहेत. परंतू ही शस्त्रे तालिबान वापरू शकणार नाहीय. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने याची माहिती दिली आहे. यूएस सेंट्रल कमांडचे कमांड जनरल किनिथ मैकेंजी यांनी सांगितले की, अमेरिकेला विमानतळावर काही शस्त्रे सोडावी लागली आहेत. यामध्ये काऊंटर रॉकेट, आर्टिलरी, मोर्टार (C-RAM) मिसाईल डिफेन्स सिस्टिम आदी आहे. ही शस्त्रे विमानतळावरच ठेवण्यात आली होती. सोमवारी जेव्हा रॉकेट हल्ले करण्यात आले तेव्हा याच सिस्टिमने ही रॉकेट पाडली.
Afghanistan: तालिबानने गुडघे टेकले! पंजशीरमध्ये घुसणार नाही; अहमद मसूदसोबत शस्त्रसंधीवर चर्चाएवढेच नाही तर 70 MRAP वाहने देखील विमानतळावर आहेत. याशिवाय 72 विमाने, 27 मल्टी पर्पज व्हेईकल देखील अमेरिका विमानतळावर सोडून गेला आहे. अमेरिकी सैन्यानुसार जी शस्त्रे सोडली आहेत, त्यांचा वापर कोणीही करू शकणार नाही अशा अवस्थेत ठेवण्यात आली आहेत. ही शस्त्रे पुन्हा वापरात आणण्यासाठी खूप काळ आणि मेहनत करावी लागणार आहे. यामुळे ही शस्त्रे तालिबानसाठी वापरायोग्य असणार नाहीत.
Afghanistan: पंजशीरमध्ये अफगाण योद्ध्यांनी केलेले स्वागत पाहून तालिबानी हादरले; Video व्हायरल
याशिवाय जी वाहने अमेरिकेने तिथे सोडली ती देखील वापरता येणार नाहीत. मात्र, अमेरिकेने त्या 72 विमानांची माहिती दिलेली नाही जी काबुल विमानतळावर सोडलेली आहेत. जी विमाने विमानतळावर सोडली आहे ती आता वापरता येणारी नाहीत, एवढेच अमेरिका म्हणाली आहे.