काबूल - अफगाणिस्तानात रॉकेट हल्ले सुरू आहेत आणि अशा परिस्थितीतच अमेरिका आपले सैन्य माघारी घेत आहे. काबूल विमानतळावरील आत्मघाती हल्ल्यानंतर तेथील परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. आपल्या जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अमेरिका सातत्याने हवाई हल्ले करत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास एक मोठा पलटवारही झाला. येथील परिस्थिती इस्रायल-पॅलेस्टाइन प्रमाणे झाली आहे. काही दिवसांपूर्वी, तेथेही अशाच प्रकारे आकाशातून रॉकेटचा वर्षाव होताना दिस होता. (Afghanistan who launch rocket in kabul airport american troops taliban isis) काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सोमवारी असाच देखावा बघायला मिळाला. विमानतळाला लक्ष्य करून हे रॉकेट डागण्यात आले होते. हे पाचही रॉकेट विमानतळाजवळूनच डागण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, हे रॉकेट काबूल विमानतळाला लक्ष्य करूनच कारमधून डागण्यात आले. मात्र, हे रॉकेट एअर फिल्ड डिफेन्स सिस्टीमने निष्क्रिय करण्यात आले. यातील एक रॉकेट वसती भागात पडले.
''तालिबानला मान्यता द्या अन्यथा होऊ शकतो ९/११ सारखा हल्ला''
यापूर्वी रविवारी अमेरिकेकडून हल्ला झाला होता. म्हणजेच दोन्ही बाजूंनी हवेत प्रतिहल्ले सुरू आहेत. सोमवारी सकाळी काबूलच्या आकाशात रॉकेटच्या गडगडाटाने संपूर्ण शहर हादरले होते. सर्वत्र धूर दिसत होता. एपीने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने म्हटले आहे, की हे रॉकेट काबूलच्या सलीम कारवां भागात पडले. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोक धावू लागले. केवळ रॉकेटच नाही, तर यानंतर गोळीबाराचा आवाजही ऐकू आला.
अफगाणिस्तानची राजधानीत सकाळी-सकाळीच कुणी हदरविण्याचा प्रयत्न केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काबूल विमानतळ सध्या पूर्णपणे अमेरिकन लष्कराच्या ताब्यात आहे आणि तालिबानही तेथे उपस्थित आहे.
तालिबानला जगातील सर्वच देशांसोबत हवे आहेत चांगले संबंध; भारतासंदर्भात केलं असं भाष्य
अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू - आयसिसच्या दहशतवाद्यांना संपविण्याच्या तसेच संभाव्य हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेने काबूलमध्ये ड्रोन हल्ले केले. यामध्ये सहा मुलांसह 9 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. यामुळे बायडेन सरकारवर टीका होऊ लागली आहे. हे सर्व मृत एकाच कुटुंबातील होते. इस्लामिक स्टेट खुरासान गटाचे दहशतवादी काबूल विमानतळावर आणखी हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. हे दहशतवादी बसलेल्या एका वाहनाला ड्रोनने उडविण्यात आले. हे वाहन रहिवासी भागातून जात होते. यामुळे त्या परिसरात असलेल्या 9 लोकांचा मृत्यू झाला.