काबूल:तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता हळूहळू त्याने नियम आणि कायद्यांवर आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, तालिबाननंअफगाणिस्तानच्या महिलांना बुरखा घालणं आवश्यक नसल्याचं म्हटलं आहे. पण, त्यांना हिजाब घालावा लागेल, असही सांगितलं.
Afghanistan: काबूलवरुन उड्डाण घेतलेल्या विमानाच्या चाकात आढळले मानवी अवशेष
हिजाब घालणे बंधनकारक ब्रिटनच्या स्काय न्यूजशी बोलताना तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की, बुरखा हा एकमेव हिजाब (हेडस्कार्फ) नाही. हिजाबचे अनेक प्रकार आहेत. बुरखा हा एक ड्रेस आहे, जो संपूर्ण डोक्यापासून पायापर्यंत शरीराला झाकतो. पण, आमच्या सरकारमध्ये महिलांना बुरखा घालणे बंधनकारक नसेल, पण त्यांना हिजाब घालावाच लागेल. हा हिजाब कुठल्या प्रकारचा असेल, हे लवकरच सांगितले जाईल.
महिलांचे शिक्षण सुरू ठेवणारजगभरातील सर्व संघटना आणि देशांनी अफगाणिस्तानमधील महिलांच्या शिक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तालिबाननं काबूलसह अफगाणिस्तानातील सर्व प्रमुख शहरांवर नियंत्रण मिळवल्याने ते हळूहळू नवीन कायद्यांद्वारे आपले नियंत्रण प्रस्थापित करत आहेत. पण, शाहीन, मॉस्को कॉन्फरन्स आणि नंतर दोहा कॉन्फरन्सचा संदर्भ देत म्हणाले की, आम्ही आधीच सांगितले आहे की, मुलींना प्राथमिक ते विद्यापीठापर्यंतचे शिक्षण करता येईल. आम्ही हा मुद्दा अनेकदा आंतरराष्ट्रीय मंचावरुन स्पष्ट केला आहे. तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागात पूर्वीप्रमाणे हजारो शाळा सुरू राहतील. पण, अद्याप तालिबानकडून अधिकृतपणे मुलींच्या शिक्षण आणि महिलांच्या रोजगाराबाबत कोणतेही धोरण जाहीर केलेले नाही.
तालिबानच्या राजवटीत कायदे कडकयापूर्वी, 1996-2001 या काळात अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा होता. त्यावेळेस तालिबानने इस्लामिक कायदा शरिया देशभरात लागू केला होता. त्याचा सर्वात जाचक परिणाम फक्त स्त्रियांवर झाला होता. तेव्हा मुलींचे शिक्षण बंद करण्यात आले होते. तसेच, महिलांना काम करण्यास किंवा एकट्यने प्रवास करण्यासही बंदी होती. घराबाहेर पडतानाही आपल्या नवऱ्यासोबत किंवा घरातील एखाद्या पुरुषासोबतच बाहेर जाता येत होते. ते पण डोक्यापासून पायापर्यंत लांब बुरखा घालूनच. या सर्व कायद्यांमुळेच तालिबानचा विरोध होतोय.