अफगाणिस्तानच्या (Afghanistan) अशरफ गनी सरकारमध्ये टॉप पोलीस अधिकारी राहिलेली ३४ वर्षीय गुलअफरोज ऐबतेकर आपला जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे भटकत आहे. तालिबानी तिला सगळीकडे शोधत आहेत. ऐबतेकरने अफगाणिस्तानातून निघण्यासाठी भारतासहीत वेगवेगळ्या दूतावासांकडे मदतीची मागणी केली. पण तिला कुणीही मदत केली नाही. अमेरिकन सैनिक तिला सोबत नेतील या आशेवर तिने काबुल एअरपोर्टवर काही दिवस घालवले. पण तेही तिला मरण्यासाठी सोडून गेले.
एअरपोर्टवर झाला होता हल्ला
‘डेली मेल’ च्या रिपोर्टनुसार, गुलअफरोज ऐबतेकर अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या गुन्हे शाखेची डेप्युटी चीफ होती. तिला अफगाणिस्तानातील अनेक महिला प्रेरणा मानत होत्या. पण आज तिलाच जीव वाचवणं अवघड झालं आहे. तालिबानी तिचा शोध घेत आहेत आणि त्यामुळे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळून जात आहे. काबुल एअरपोर्टवर तालिबान्यांनी तिच्यावर हल्लाही केला होता. पण ती कशीतरी तेथून पळून गेली होती.
तालिबान मला मारेल
गुलअफरोज ऐबतेकर म्हणाली की, 'मी अनेक देशांकडे मदत मागितली की, मला आणि माझ्या परिवाराला वाचवा. मी पाच दिवस एअरपोर्टच्या रिफ्यूजी कॅम्पमध्ये राहिली. मला आशा होती की, अमेरिकन माझी मदत करतील. पण त्यांनीही वेळेवर दगा दिला. आता माझ्याकडे बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग नाही. जर तालिबान्यांनी मला पकडलं तर ते माझा जीव घेतील'. गुलअफरोज एकमेव अशी अफगाण महिला आहे जिने पोलीस अकादमीमध्ये मास्टर डिग्रीसोबत ग्रॅज्युएशन केलं. तिच्या नावानेच गुन्हेगार घाबरत होते.
अमेरिकेने केली नाही मदत
लेडी कॉप म्हणाली की, 'जेव्हा मी एअऱपोर्टवर अमेरिकन सैनिकांना पाहिला तेव्हा मी सुटकेचा निश्वास टाकला. मला वाटलं आता आम्ही सुरक्षित आहोत. पण काही दिवसात मला माझ्या चुकीची जाणीव झाली. मी मोडक्या इंग्रजीत अमेरिकन सैनिकांना सांगितलं की, माझा जीव धोक्यात आहे. मी त्यांना माझा पासपोर्ट, पोलीस आयडी आणि पोलीस सर्टिफिकेटही दाखवलं. पण त्यांनी मदत केली नाही'.
रशियानेही केली नाही मदत
गुलअफरोजने काही महिलेने रशियात शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे तिने रशियन दूतावासाकडे मदत मागितली होती. पण तिथेही निराशाच हाती लागली. एअरपोर्टवरून घरी परतल्यावर गुलअफरोजच्या आईने तिला सांगितलं की, तालिबानी तिला शोधत आले होते. त्यानंतर ती पुन्हा एअरपोर्टवर मदतीसाठी गेली होती. तिथे तालिबानी मुलांनी तिला मारहाण केली. तिथून कशीबशी पळून ती अंडरग्राउंड झाली.