नवी दिल्ली :
चीनमध्ये वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळविण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या चाचणीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, चीनमध्ये ही चाचणी किती कठीण आहे, हे या व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येत आहे. या चाचणीची काठिन्य पातळी बघून समाजमाध्यमांवरील वापरकर्ते अचंबित झाले आहेत.
चीनमधील तानसू येगेन नावाच्या एका चिनी तरुणाने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
प्रचंड कठीण टेस्ट...- ड्रायव्हिंग टेस्टिंगसाठी जो रस्ता बनविला आहे, त्याच्या दोन्ही बाजूंनी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या लावलेल्या आहेत. या रस्त्याची रुंदी फारच कमी आहे. काही ठिकाणी तो सरळ तर काही ठिकाणी वाकडा-तिकडा आहे. - त्यात मध्येच अनेक अडथळे आहेत. पार्किंगपासून ते ८ बनविण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. पांढऱ्या रेषेला गाडीने स्पर्श केल्यास चालक चाचणीत नापास होतो.