कोरोना व्हायरसने अमेरिकेत धुमाकूळ घालायला सुरुवात केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट जागतिक आरोग्य संगटनेलाच जबाबदार धरण्यास सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी WHO चा निधीच रोखला असून चीनवर कारवाई न केल्याने आणि पाठीशी घातल्याचा गंभीर आरोप लावला होता. याला आता चीनने जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
WHO ला एकूण मदतीपैकी १५ टक्के निधी हा अमेरिका देत होती. यामुळे WHO अ़डचणीत आली होती. मदत रोखल्याने गरीब देशांना वैद्यकीय पुरवठा ठप्प होण्याची भीती WHO ला होती. आता या संघटनेच्या मदतीला चीन धावून आला आहे. चीनने सांगितले की, कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी चीन WHO ला तीन कोटी डॉलरची अतिरिक्त मदत करणार आहे. याआधी चीनने डब्ल्यूएचओला दोन कोटी डॉलर दिले होते.
चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले की, चीनने डब्ल्यूएचओला तीन कोटी डॉलर अतिरिक्त दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम आधी दिलेल्या २ कोटी डॉलरहून अतिरिक्त असणार आहे. हा निधी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी दिला जाणार आहे. विकसनशील देशांची आरोग्य व्यवस्था यामुळे मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. WHO ही संयुक्त राष्ट्राची संघटना आहे. या संघटनेला मदत करणे म्हणजे चीन सरकार आणि आमच्या नागरिकांचा या संघटनेवर किती विश्वास आहे हे दाखविते.
काही अमेरिकी खासदारांनी WHO चे अध्यक्ष टेड्रोस यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून टेड्रोस यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिका WHO ला निधी देण्यात येणारा निधी रोखण्यावर पुनर्विचार करेल अशी आशा आहे. टेड्रोस यांनी लोकांचा जीव वाचविण्यासाठी काम करत राहण्याचे आवाहन केले आहे.
आणखी वाचा...
सावधान! आता पीएफ अॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल
मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह
विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात