ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. १३- पती आणि पत्नीचं नातं नेहमीच सलोख्याचं असतं. एकमेकांना सांभाळून दोघंही संसाराचा रहाटगाडा हाकत असतात. मात्र जेव्हा त्यातल्या एकानं दुस-याचं मन दुखावलं तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. याचा विचार न केलेलाच बरा.
पत्नीनं घटस्फोट दिल्यानं पतीनं निषेध नोंदवण्यासाठी एक अनोखा प्रकार केला आहे. त्यानं हाताच्या दंडावर फुलांच्या मधोमध पत्नीचा सुंदर रूपातला कोरलेला टॅटू चक्क सैतान अवतारात परावर्तित करून घेतला आहे. या टॅटूला आता जगभरातून लाइक मिळत आहेत.
हे टॅटू आर्टिस्ट जोजो एकेरमन यानं कोरलं आहे. हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा फोटो आतापर्यंत 4.5 बिलियन लोकांनी बघितला आहे.