शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

नाट्यमय घडामोडींनंतर तुर्कीतील टिष्ट्वटबंदी मागे

By admin | Published: April 07, 2015 11:13 PM

तुर्कस्तानात दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या वकिलाची छायाचित्रे प्रसिद्ध केल्याने इस्तंबुल येथील न्यायालयाने सोमवारी ट्विटरवर बंदी घातली.

इस्तंबुल : तुर्कस्तानात दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या वकिलाची छायाचित्रे प्रसिद्ध केल्याने इस्तंबुल येथील न्यायालयाने सोमवारी ट्विटरवर बंदी घातली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ही बंदी कायम होती. मेहमत सेलिम किराझ या वकिलाचे अपहरण गेल्या आठवड्यात झाले होते व नंतर ओलिस आणि पोलीस यांच्यातील चकमकीत तो मारला गेला. या संवेदनशील घटनेची फिल्म दाखविण्यास इस्तंबुल न्यायालयाने ट्विटरला बंदी घातली होती. त्यानंतर ट्विटरची सेवा सोमवारी रात्रीपर्यंत बंद होती.ट्विटरवरील या बंदीचा परिणाम इतर सोशल वेबसाईटस्वर झाला. फेसबुकनेही न्यायालयाच्या आदेशानुसार आपला काही मजकूर ब्लॉक केला. सोमवारी सायंकाळी इस्तंबुल न्यायालयाने गुगललाही वादग्रस्त मजकूर व छायाचित्रे काढून टाकण्याचा आदेश दिला. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा झालेल्या वाटाघाटीनंतर ही बंदी उठवण्यात आली.तुर्कस्तानचे अध्यक्ष तय्यिप इरोदगान यांचा प्रवक्ता इब्राहीम कलीनने या संदर्भात बोलताना सांगितले की, बंदुकीच्या धाकावर अपहरण केलेल्या व नंतर मरण पावलेल्या वकिलाची छायाचित्रे व मजकूर काढून टाकण्याची मागणी वकिलाच्या कुटुंबियांनी केली होती. सोशल वेबसाईटस् ओलिसांची छायाचित्रे प्रसिद्ध करून दहशतवाद्यांच्या भूमिकेचा प्रसार करत आहेत, असे कलीनने अंकारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.गेल्या वर्षी तुर्कस्तानने सोशल वेबसाईटस्वर कधीही बंदी घालता यावी असे कायदे केले आहेत. २०१४ च्या दुसऱ्या सहामाहीत तुर्की सरकारने पाच वेळा ट्विटरवर मजकूर काढून टाकण्यासाठी दबाव आणला .