हेलेसिंकी - फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टी करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने वादाला तोंड फुटले आहे. फिनलँडमधील विरोधी नेत्यांनी व्हिडीओवरून पंतप्रधान सना मरिन यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर पंतप्रधानांची ड्रग्स टेस्ट करावी, अशी मागणी केली आहे. मात्र सना मरिन यांनी ड्रग्स घेतल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांनी पार्टीमध्ये केवळ मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर सना मरीन यांचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या त्यांच्या मित्रांसोबत डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओबाबत सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. पंतप्रधान सना मरिन यांनी आपल्या या व्हिडीओबाबत सांगितले की, आपला व्हिडीओ तयार केला जात हे मला माहिती होते. मात्र हा व्हिडीओ सार्वजनिक करण्यात आल्याने मला दु:ख झालं आहे.
सना मरिन यांनी सांगितलं की, त्यांनी पार्टी केली, डान्स केला आणि गाणे पण गायले. या सर्व कायदेशीर बाबी आहेत. मात्र ड्रग्स सेवनाचा आरोप त्यांनी फेटाळला. अशी कधीही वेळ आली नाही. जेव्हा मी ड्रग्सचं सेवन केलंय, असे त्या म्हणाल्या. तसेच मी कुठल्या ड्रग्स सेवन करणाऱ्यालाही ओळखत नाही.