वॉशिंग्टन- भारतासह जगभरातील देश रोजगारनिर्मिती कशी करायची या आव्हानाचा सामना करत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी मात्र आपण सत्तेवर आल्यापासून म्हणजे गेल्या वर्षभरात 24 लाख रोजगार निर्माण केल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या स्टेट ऑफ युनियन अॅड्रेस या भाषणात त्यांनी ही माहिती जाहीर केली.डोनल्ड ट्रम्प यांच्या भाषणावेळेस काँग्रेसच्या आत आणि बाहेरही त्यांना मोठा विरोध होत होता. ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले, अमेरिकेचे स्वप्न सत्यात आणण्याची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा दुसरी कोणतीही वेळ चांगली असू शकत नाही. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात करसुधारणा, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास, स्थलांतर नियमसुधारणा, राष्ट्रीय सुरक्षा अनेक विषयांवर मत व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांच्या काळामध्ये सध्या अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.
उत्तर कोरियाच्या हुकुमशाहीवर टीकास्त्र
डोनल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणामध्ये उत्तर कोरियाच्या हुकुमशाहीचाही उल्लेख केला. आजवर आपल्याच जनतेवर अन्याय करणारा असा कोणताच देश नसेल अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्यावर टीका केली. उत्तर कोरियाची अण्वस्त्र स्पर्धा धोकादायक असल्याचे सांगत त्यामुळे उत्तर कोरियालाही धोका असल्याचे त्यांनी सांगितले.श्रीनिवास कुचिभोटला यांची पत्नीही भाषणाला उपस्थितभारतीय वंशाचे इंजिनियर श्रीनिवास कुचिभोटला यांची पत्नी सुनयना दुमाला यांनीही या भाषणाला हजेरी लावली. श्रीनिवास यांची गेल्यावर्षी झालेल्या गोळबारात हत्या करण्यात आली होती,. काँग्रेससदस्य केविन योडर यांनी दिलेल्या आंमत्रणामुळे सुनयना यांनी हे भाषण ऐकण्यासाठी उपस्थित राहाण्याचा निर्णय घेतला.