ढाका/कोलंबो: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला मोठा तडाखा दिल्याचे पाहायला मिळाले. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. तसेच देशात कोरोना लसींचा तुटवडाही जाणवू लागला होता. यावर उपाय म्हणून भारताने कोरोना लसींची निर्यात थांबवली. मात्र, याचा फटका भारताच्या शेजारील राष्ट्रांना बसला आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांनी चीनकडून कोरोना लस घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण, चीनने लसीसाठी अधिक रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जात आहे. (after india export ban china taking high price for sinopharm corona vaccine from sri lanka bangladesh)
भारताकडून शेजारील राष्ट्रांना कोव्हिशिल्ड लसींची निर्यात केली जात होती. त्यासाठी कोरोना लसीच्या एका डोससाठी ५.५ डॉलर दर आकारला जात होता. मात्र, आता भारताने कोरोना लसींची निर्यात बंद केल्यानंतर श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी चीनकडून लस घेण्याचा निर्णय घेतला. चीननेही आपल्या सिनोफार्म लस देण्याची तयारी दर्शवली. मात्र, यासाठी श्रीलंका आणि बांगलादेश यांना अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.
“उत्तर प्रदेशमधील मृत्यूदर हा अमेरिका आणि युरोपपेक्षाही कमी”: योगी आदित्यनाथ
दक्षिण आशियातील देशांसाठी वेगवेगळे लस दर
चीनने दक्षिण आशियातील देशांसाठी वेगवेगळे लस दर ठरवले आहेत. बांगलादेशला एक डोससाठी १० डॉलर, तर श्रीलंकेला सिनोफार्मच्या एका लसीच्या डोससाठी १५ डॉलर मोजावे लागत आहेत. बांगलादेशमधील 'द डेली स्टार'च्या वृत्तात म्हटले आहे की, बांगलादेश सिनोफार्मकडून १.५ कोटी डोस खरेदी करणार आहे. लस डोस खरेदीसाठी कॅबिनेट समितीने त्याला मंजुरी दिली आहे. मात्र, लसीचा एक डोस १० डॉलरला खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे.
संजय राऊत यांच्याबद्दल रोज रोज काय बोलायचं? देवेंद्र फडणवीसांचा टोला
दोन कोटी डोस पुढील महिन्यात श्रीलंकेत
चीनच्या सिनोफार्म लसीचे दोन कोटी डोस पुढील महिन्यात श्रीलंकेत दाखल होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेने प्रत्येकी एक डोस १५ डॉलर्सवर विकत घेतली आहे. मात्र, श्रीलंकेने भारताकडून ५.५ डॉलर किंमतीला कोव्हिशिल्ड लसीचा एक डोस खरेदी केला आहे, असे श्रीलंकेच्या डेलीच्या वृत्तात म्हटले आहे. श्रीलंकेच्या सरकारलाही या लसीच्या किंमतींबाबत वादाला तोंड द्यावे लागणार आहे.
दरम्यान, देशाला सर्वात कमी किंमतीवर सिनोफॉर्म लस मिळाली आहे. या लशीची किंमत १८ ते ४० डॉलर दरम्यान आहे. किंमती काही परिस्थितीत बदलू शकतात, असे लंकेच्या आरोग्य सेवा महासंचालक डॉ. असेला गुणवर्धने यांनी सरकारचा बचाव करताना सांगितले आहे.