बगदाद : इराकी सैन्याने तिक्रीत शहर सुन्नी बंडखोरांच्या ताब्यातून मिळविण्यासाठी शनिवारी व्यापक लष्करी मोहीम सुरू केली असून शहरानजीक सैन्य व बंडखोरात भीषण चकमक सुरू आहे. माजी हुकूमशहा दिवंगत सद्दाम हुसेन याचे मूळ शहर असलेले तिक्रीत सुन्नीबहुल आहे.
एका वरिष्ठ अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, इराकी लष्करास अमेरिकी सैनिकांचे सहकार्य मिळत आहे. अमेरिकेने इराक सरकारच्या मदतीसाठी सैन्य सल्लागार तैनात केले आहेत. अनेक भागांवरचा सरकारचा ताबा सुटल्यानंतर बंडखोरांना हाकलून लावण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच व्यापक मोहीम उघडण्यात आली आहे. यात कमांडो, टँक, हेलिकॉप्टर तथा सरकार समर्थकांचा समावेश आहे.
इराकी सैन्याने तिक्रीतवर चाल केली असतानाच अमेरिकी सशस्त्र ड्रोन राजधानी बगदादमध्ये तैनात करण्यात आले आहेत.
मलिकींवर आरोप
दरम्यान, सुन्नी अल्पसंख्याकांच्या प्रलंबित तक्रारींवर मलिकी यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा तसेच मलिकी सुन्नींना भेदभावाची वागणूक देत असल्याचाही आरोप होत आहे. (वृत्तसंस्था)
4सर्वाधिक प्रभावशाली शिया मौलवींच्या आवाहनानंतर इराकमधील राजकीय नेत्यांवर नव्या पंतप्रधानांच्या निवडीसाठी दबाव वाढला आहे. शिया मौलवींनी पुढील महिन्यात होणा:या संसद अधिवेशनापूर्वी नव्या पंतप्रधानाबाबत अंतिम तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
4सुन्नी बंडखोरांमुळे इराकच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालेल्या पाश्र्वभूमीवर शक्तिशाली मौलवी अयातुल्ला अली अल सिस्तानी यांनी हे आवाहन केले आहे.
4गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान नूरी अल मलिकी यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, मलिकी यांना सध्या पद शाबूत ठेवण्यासाठी मोठा सत्तासंघर्ष करावा लागत आहे.
करबलात 231 भारतीय ओलीस
4इराकमधील हिंसाचारादरम्यान करबलात 231 भारतीय तरुणांना त्यांच्या कामाच्या ठिकाणीच ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यांना ओलीस ठेवणा:या इराकी नागरिकांची अद्याप ओळख पटलेली नाही. या भारतीयांना खाण्यासाठी दिवसातून एकवेळ किंवा दोनवेळा खजूर आणि तांदूळ दिला जातो, अशी माहिती एका तरुणाने दिल्याचे एका वृत्तपत्रने म्हटले आहे.
या तरुणांना दोन महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. त्यांनी घरी जाऊ देण्याची विनंती केल्यानंतरही त्यांना कंपनीच्या आवाराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. इराकमधील करबला आणि नजफ या शियाबहुल शहरांत संघर्ष नाही. मात्र, इराकमधील हिंसाचार आणि अस्थिरता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.