ऑनलाइन लोकमत
निकरागुआ, दि. 24 - ज्वालामुखी अभ्यासक आपल्या मार्गदर्शकासोबत जिवंत ज्वालामुखीत पडूनदेखील आश्चर्यकारकरित्या वाचला आहे. या दोघांनाही अग्निशन दलाच्या स्थानिक जवानाने वाचवलं आहे. अर्जेंटिनाचा नागरिक असलेले रोडोल्फ अल्वारेज (60) निकरागुआमधील मार्गदर्शक एड्रिक वैलाद्रेज (25) याच्यासोबत जात असताना दोर तुटल्याने मसाया ज्वालामुखीच्या खड्ड्यात जाऊन पडले.
यानंतर एका अग्निशमन दलाच्या स्थानिक जवानाने दोरच्या सहाय्याने खाली उतरुन दोघांचीही सुटका केली. रोडोल्फ अल्वारेज आणि एड्रिक वैलाद्रेज दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. मात्र ज्वालामुखीच्या या खड्ड्यात तापमान प्रचंड असल्याने दोघांनाही डिहायड्रेशनचा त्रास झाला आहे.
मानगुआपासून 12 मैलावर दक्षिणेकडे मसाया ज्वालामुखी आहे. 1772 मध्ये पहिल्यांदा हा ज्वालामुखी जागा झाला होता. 2001 मध्ये या ज्वालामुखीमधून भीषण स्फोट झाले होते. तब्बल 500 मीटर दूरपर्यत लाव्हा आणि दगडं आली होती. या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाली होता.