शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

सात वर्षांच्या कोमानंतर तिने तिची मुलगी पहिल्यांदा पाहिली

By admin | Published: March 13, 2017 12:39 AM

बाळंतपणाच्या अतितीव्र वेदनांमुळे २००९ मध्ये कोमात गेलेली २५ वर्षांची आई सात वर्षांनंतर कोमातून बाहेर आल्यावर आपल्या तेव्हा जन्म दिलेल्या मुलीला पहिल्यांदाच बघू शकली

बाळंतपणाच्या अतितीव्र वेदनांमुळे २००९ मध्ये कोमात गेलेली २५ वर्षांची आई सात वर्षांनंतर कोमातून बाहेर आल्यावर आपल्या तेव्हा जन्म दिलेल्या मुलीला पहिल्यांदाच बघू शकली. डॉक्टरांसाठी ही घटना चमत्काराइतकीच आहे. डॅनिजेला कोव्हॅसेव्हीक असे या आईचे नाव असून ती सर्बियातील व्होजव्होदिना येथील आहे. डॅनिजेला हिला तिची मुलगी मरिजा हिला जन्म देताना पू झाला व डॅनिजेला कोमात गेली. कोमात एवढा प्रदीर्घ काळ राहून कोणी पुन्हा त्यातून बरे झाल्याचे सर्बियाच्या वैद्यकीय क्षेत्रातील कोणाच्या बघण्यात नाही. डॅनिजेलाच्या कौटुंबिक मित्राने सांगितले की,‘‘शाळा संपली की मरिजा रोज तिच्या आईच्या जवळ असायची. मुलगी आईचे सांत्वन करायची, ती हसेल असे काही करायची. आई मला एक दिवस स्पर्श करील आणि कवटाळेल ही आशा कधी तिने सोडली नाही.’’ आता माझी मुलगी पेन हातात धरते आणि औषधांच्या गोळ््याही घेते हे डॅनिजेलाचे वडील डीजोरदीजे कोव्हॅसीव्हीक यांनी सांगितले. अर्थात ही अगदीच प्राथमिक स्वरुपाची प्रगती आहे परंतु डॅनिजेलाची परिस्थिती आता पूर्वीपेक्षा खूप चांगली आहे. आता तिचे वजनही वाढले आहे, ती आता अधिक सावध दिसते आणि उत्साही. ती हसून प्रतिसाद देते व तिला रागही येतो, असे ते म्हणाले. तुम्ही एका लहान मुलाला काही गोष्टी करायला शिकवत आहात. ती आठशे मीटर अंतर चालली व ते फार मोठे यश आहे, असे ते म्हणाले.