लोकमत न्यूज नेटवर्क : जगात तिसऱ्या लाटेशी दोन हात करण्याची तयारी सुरू असतानाच अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने एक नव्या लसीची घोषणा केली आहे. ही लस केवळ कोरोनापासूनच बचाव करत नाही तर फ्लूपासूनही वाचवेल, असा दावा कंपनीने केला आहे. काय आहे ही लस.. जाणून घ्या...
सुपर लस; कोरोना अन् फ्लूवरही करणार काम
एमआरएनए १०७३ ही लस कोरोना स्पाईक प्रोटिन आणि फ्ल्यू हेमाग्लगुटिनिन गायकोपोटिनपासून सुरूक्षा देईल.
कशी तयार केली लस ?
एमआरएनए पद्धतीने ही लस तयार करण्यात येत आहे. या पद्धतीने तयार केलेली लस अनेक आजारांपासून संरक्षण करेल, असा कंपनीचा दावा आहे. या लसीचा एकच डोस घ्यावा लागेल. त्यामुळे दुसऱ्या डोसची चिंताही मिटेल. श्वसनप्रक्रियेवर हल्ला करणाऱ्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी या लसीचा उपयोग होईल. त्यामुळे अनेक आजारांपासूनही बचाव होऊ शकेल, असा दावाही कंपनीने केला आहे.
कधी येईल ही लस?
अद्याप ही लस चाचणीच्या पातळीवरच आहे. त्यानंतर या लसीच्या अनेक टप्प्यांमध्ये विविध वयाच्या व्यक्तिंवर चाचण्या होतील. त्या यशस्वी झाल्यानंतर लसीच्या वापराला मंजुरी मिळेल.
कोणाला चालू शकेल ही लस?
या लसीचा वापर प्रौढांसाठी तर होईलच. पण शिवाय लहान मुलांनाही चालेल का, याचीही चाचपणी केली जात आहे. सहा वर्ष वयापेक्षा लहान मुलांना आणि दोन वर्ष ते सहा महिन्यांपर्यंत वय असलेल्या बाळांना किती प्रमाणात डोस देता येईल, याचाही अभ्यास सुरू आहे.