लंडन : दहशतवाद निपटून काढण्यासाठी पाकिस्तान सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. देशामध्ये शांती व स्थैर्य नांदावे या दिशेने पाकिस्तानची पावले पडत आहेत, असा दावा त्या देशाचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी केला.लंडन येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ स्ट्रॅटेजिक स्टडीज (आयआयएसएस) या संस्थेने आयोजिलेल्या एका कार्यक्रमात शुक्रवारी ते बोलत होते. दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद पूर्णपणे तोडण्यासाठी आॅक्टोबरपर्यंत पाकिस्तानने उपाययोजना करावी, असा इशारा फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिला होता. त्याच्या दुसºयाच दिवशी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी त्याबद्दल सूचक वक्तव्य केले.त्यांनी सांगितले की, दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध देशांनी विशेषत: पाकिस्तानच्या शेजारी देशांनी पुढे येऊन परस्परांच्या सहकार्याने ही मोहीम राबवावी. बाजवा यांनी भारताचे थेट नाव न घेता हे आवाहन केले.ते म्हणाले की, दहशतवादामुळे पाकिस्तानला भूतकाळात खूप त्रास सहन करावा लागला आहे. भविष्यातही तशाच परिस्थितीला सामोरे जाण्याची आम्हाला इच्छा नाही.दक्षिण आशियातील देशांमध्ये अनेक वर्षांपासून असलेल्या मतभेदांवर योग्य तोडगा निघाल्यास या क्षेत्रामध्ये शांती व स्थैर्य नांदू शकते. जनरल कमर जावेद बाजवा हे पाच दिवसांच्या लंडन दौºयावर आले आहेत. ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये स्थैर्य नांदले तर परकीय गुंतवणुकीतही वाढ होईल.आर्थिक मदतीवर होऊ शकतो परिणामदहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा करण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याची भारताने केलेली मागणी एफएटीएफने फेटाळली होती.सध्या तरी पाकिस्तानला करड्या (ग्रे) यादीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या खूपच खालावलेली आहे.
टास्क फोर्सच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान वरमला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 4:21 AM