पैसा आणि प्रसिद्धीसाठी अनेकजण इतक्या खालच्या थराला जातात की, कल्पनाही केली जात नाही. पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका महिला सीईओने इतका मोठा गुन्हा केला की वाचून हैराण व्हाल. सिलिकॉन व्हॅली स्टार एलिजाबेथ होम्स (Elizabeth Holmes) ला अमेरिकन (America) कोर्टाने फसवणुकीच्या केसमध्ये दोषी ठरवलं आहे. आता तिला अनेक वर्ष तुरूंगातच रहावं लागणार. तीन महिने चाललेल्या सुनावणीनंतर कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलं की, होम्सने ब्लड-टेस्टिंग स्टार्टअपच्या नावावर लोकांनी मोठ्या प्रमाणात फसवणूक केली.
कशी आणि कुणाची केली फसवणूक?
WION ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन ब्लड टेस्टींग कंपनी थेरानॉस (Theranos) ची माजी सीईओ एलिजाबेथ होम्सवर आरोप होता की, तिने सोप्या ब्लड टेस्टच्या नावावर फसवलं आणि गुंतवणुकदारांचे कोट्यावधी डॉलर हडप केले. होम्सन कुठेही सोबत नेऊ शकाल असं ब्लड एनालायजर विकसित करण्याचा दावा केला होता. तिने सांगितलं होतं की, या मशीनने बोटातून रक्त घेऊन सगळे टेस्ट केले जाऊ शकतात. पण सत्य काहीतरी वेगळंच होतं.
कोर्टाने सोमवारी आपल्या निर्णयात माजी सीईओ वायर फ्रॉडचे दोन काउंट आणि षडयंत्राचे दोन काउंट याबाबत दोषी ठरवलं. प्रत्येक काउंटसाठी तिला २० वर्षांची शिक्षा भोगावी लागले. ३७ वर्षीय होम्सच्या या फसवणुकीच्या केसमध्य अनेक लोकांनी साक्ष दिली. सुनावणी दरम्यान अनेक पुरावे सादर केले गेले. ज्यातून हे स्पष्ट झालं की, तिने ठरवून प्लान करून ही फसवणूक केली.
द्यावा लागला होता राजीनामा
एलिजाबेथ होम्सने हा दावा केला होता की, तिच्या कंपनीचे काही प्रॉडक्ट अमेरिकन संरक्षण खाात्याने अफगाणिस्तानातील युद्धात वापरले होते. हे प्रकरण समोर आल्यावर तिला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि कोणत्याही कंपनीत निर्देशक बनण्यावर बंदी घालण्यात आली होती. होम्सने दंड म्हणून १२२ कोटी रूपयांचे शेअरही परत करण्यास मान्य केलं होतं. पण प्रकरण कोर्टात गेलं आणि तिला दोषी ठरवण्यात आलं