वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी ट्विट करत, एका मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला बंद करण्याची धमकी दिली आहे. ट्विटरने मंगळवारी ट्रम्प यांच्या ट्विट्ससोबत डिस्क्लॅमरलावत त्यांच्यावर एक प्रकारे फेक दावे केल्याचा आरोप लावला होता. यानंतर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर 2016च्या निवडणुकीत दखल दिल्याचा आरोपही केला आहे.
'सोशल मीडिया बंद करून टाकू'ट्रम्प यांनी बुधवारी ट्विट करत म्हटले आहे, की 'रिपब्लिकन्सना वाटते, की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कंझर्व्हेटिव्ह्सचा आवाज दाबते. आम्ही असे होण्यापूर्वीच, त्यांचे काटेकोरपणे नियमन करू अथवा ते बंद करू.' मंगळवारी ट्रम्प यांनी दोन ट्विट केले होते. यात त्यांनी दावा केला होता की मेल-इन व्होटिंगमुळे निवडमुकीत घोटाळा होतो.
सीमा वादातून नेपाळची माघार, भारताचा भूभाग नकाशात दाखविण्याचा प्रस्ताव घेतला मागे
युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज
मात्र, यासंदर्भात ट्रम्प यांनी कुठलाही पुरावा दिला नव्हता. यानंतर ट्विटरने ट्रम्प यांच्या ट्विटखाली एक लिंक लावली होती, यात, 'मेल-इन बॅलेटसंदर्भात तथ्य माहिती करून घ्यावे,' असे लिहिले होते.
जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा
ट्विटरने वॉर्निंगही अॅड केली होती -ट्रम्प बुधवारी म्हणाले होते, की आम्ही मेल-इन बॅलेटला देशात मोठ्या प्रमाणावर बळकट होऊ देऊ शकत नाही. यामुळ सगळे फसवणूक, घोटाळा आणि बॅलेटच्या चोरीसाठी मोकळे होतील. सोशल मीडियावर 2016च्या राष्ट्रपती निवडणुकीत दखल दिल्याचा आरोप करत, आम्ही असे पुन्हा होताना पाहू शकत नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
भारत-चीन सीमा वादात अचानक ट्रम्प 'प्रकटले'; मध्यस्थीसाठी तयार आहोत म्हणाले!