अफगाणिस्तानच्या कंदहारमधील शिया मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात आज जवळपास 30 जण ठार झाले. तर जवळपास 20 जण जखमी झाले, असे स्थानिक रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. या बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर, हे बॉम्बस्फोट कोणी घडवून आणले, याबद्दल अद्याप कोणतीच माहिती नाही. दरम्यान, गेल्या आठवड्यात उत्तरेकडील कुंदुज शहरातील एका मशिदीत आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली होती.
अफगाण नागरिकांना आणि विशेषत: शियांना कोणतीही सुरक्षा देण्यात तालिबान स्पष्टपणे अपयशी ठरला आहे. अफगाणिस्तानातील कुंदूझ येथे शियापंथीयांच्या मशिदीत गेल्या आठवड्यात घडविण्यात आलेल्या बाॅम्बस्फोटात सुमारे १०० जण ठार किंवा जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.
याआधी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये अशाप्रकारचे हल्ले, बॉम्बस्फोट घडविले आहेत. मात्र, त्या संघटनेने शुक्रवारच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. कुंदूझ येथे शुक्रवारी मशिदीत नमाज पठणासाठी भाविक जमलेले असताना हा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. अफगाणिस्तानात शियापंथीय अल्पसंख्याक आहेत. तालिबानींनी त्या देशावर कब्जा केल्यानंतर तेथील स्थिती अधिकच बिघडली आहे. त्यात आता नागरिकांवरच हल्ले होत असल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
कुंदूज प्रांताचे पोलीस उपप्रमुख दोस्त मोहम्मद ओबैदा म्हणाले की, मशिदीत असलेल्या भाविकांपैकी बहुसंख्य लोक बॉम्बस्फोटात ठार झाले आहेत. आत्मघाती हल्लेखोरामार्फत हा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. सर्वांच्या रक्षणासाठी तालिबान सरकार योग्य उपाययोजना करणार असल्याची माहिती दिली होती.