या मुलाचे वय आहे ११ वर्षे. वजन १९० किलो. इंडोनेशियातील आर्य नावाचा हा मुलगा सद्या चर्चेचा विषय असला, तरी घरच्यांसाठी काळजीचा विषय बनला आहे. दिवसभरात याला पाच वेळेस भोजन, यात भात, मासे आणि भाज्या यांचा समावेश आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, जन्मत: तो सामान्य मुलासारखाच होता, परंतु दोन वर्षांनंतर त्याचे वजन खूपच वाढले. त्यामुळे आता त्याचे शाळेत जाणेही बंद झाले आहे. त्याला चालतानाही खूप त्रास होतो. त्याचा आहार आता कमी करण्यात आला आहे. कारण जास्तीचा आहार त्याच्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्याची आई रोकाया म्हणतात की, मुलाचे वजन खूपच वाढत आहे. त्याच्या आरोग्याची मला खूप काळजी वाटते. आहार कमी केल्याने काही फरक पडतो का, ते आता पाहायचे आहे. त्याला नेहमीच खूप थकवा येतो. श्वास घेण्यासही त्रास होत आहे.
वय ११ वर्षे वजन १९० किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2017 12:27 AM