शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

वय 45, मात्र फिटनेस 18 वर्षांच्या युवकासारखा! उपचारांनी घटविले जैविक वय; केला १६ कोटींहून अधिक खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 06:53 IST

वय वाढत असले तरी प्रत्येकाला आपण कायम तरुण दिसावे ही मनात इच्छा असतेच. ४५ वर्षे वय असलेल्या ब्रायन जॉन्सन याने विविध उपचार व व्यायामाद्वारे आपला फिटनेस १८ वर्षाच्या युवकाएवढा राखला आहे. 

वॉशिंग्टन : वय वाढत असले तरी प्रत्येकाला आपण कायम तरुण दिसावे ही मनात इच्छा असतेच. ४५ वर्षे वय असलेल्या ब्रायन जॉन्सन याने विविध उपचार व व्यायामाद्वारे आपला फिटनेस १८ वर्षाच्या युवकाएवढा राखला आहे. जॉन्सन याचे हृदय ३५ वर्षे वयाच्या व्यक्तीइतके कार्यक्षम असून त्याची त्वचा २८ वर्षांच्या व्यक्तीइतकी सतेज आहे. ब्रायनच्या फुप्फुसांची कार्यक्षमता १८ वर्षाच्या युवकाइतकी तर पचनशक्ती १७ वर्षे वयाच्या मुलाइतकी आहे. आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्याकरिता उपचारांवर त्याने आतापर्यंत १६ कोटी रुपयांहून अधिक पैसे खर्च केले आहेत. (वृत्तसंस्था)

प्रोजेक्ट ब्लू प्रिंट सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेल्या ब्रायन जॉन्सन याचे जैविक वय घटविण्याची प्रक्रिया यापुढेही सुरू राहणार आहे. त्याच्या शरीरातील सर्व अवयव १८ वर्षे वयाच्या युवकाइतके कार्यक्षम होईपर्यंत हे उपचार केले जातील. या सर्व प्रक्रियेला प्रोजेक्ट ब्लू प्रिंट असे नाव देण्यात आले आहे.३० जणांचे पथक डॉक्टर ऑलिव्हर जोलमॅन यांच्या नेतृत्वाखाली ब्रायनवर उपचार करत आहे. 

३० डॉक्टरांच्या पथकाकडून उपचारnडॉ. ऑलिव्हर जोलमॅन यांनी ब्रायन जॉन्सन याची वैद्यकीय तपासणी केली. त्याने जैविक वय घटविण्यासाठी काय जेवण घ्यायचे, कोणता व्यायाम करायचा हे निश्चित करण्यात आले. रोज पहाटे पाच वाजता त्याचा दिवस सप्लिमेंटने सुरू होतो. त्याला लाइकोपीन, झिंक, मेटफॉर्मिन ही औषधे दिली जातात. nमेंदू अतिशय कार्यक्षम राहावा यासाठीही एक औषध दिले जाते. ब्रायनने केवळ व्हेगन फूडचे (दुग्धजन्य उत्पादनांचा समावेश नसलेले शाकाहारी खाद्यपदार्थ) सेवन करावे असा सल्ला डॉक्टरांनी त्याला दिला आहे. रोज त्याला १९७७ कॅलरी मिळेल इतका नाश्ता, जेवण दिले जाते.जैविक वयात केली ५ वर्षांनी घटब्रायन जॉन्सन रोज एक तास सकाळी व्यायाम करतो. त्याने रोज रात्री किती वाजता झोपी जावे, पहाटे किती वाजता उठावे याच्या वेळा डॉक्टरांनी निश्चित केल्या आहेत. डॉक्टर रोज त्याचे वजन, शरीरातील चरबी, बीएमआय, ग्लुकोज, हृदयाचे ठोके, ऑक्सिजनचे प्रमाण अशा गोष्टींची तपासणी करतात. तसेच दर महिन्याला त्याच्या एमआरआय, अल्ट्रासाउंड, कोलोनॉस्कोपी या चाचण्या केल्या जातात. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे ब्रायन काटेकोर पालन करत असल्याने त्याने आपले जैविक वय ५ वर्षांनी कमी केले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय