बुस्टोअर्सिझियो (इटली) : अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी फिनामेकॅनिका कंपनीचा माजी अध्यक्ष व प्रमुख कार्यकारी अधिकारी ग्युसेप आॅर्सी याला तसेच अगुस्ता वेस्टलँडचा माजी प्रमुख ब्रुनो स्पॅग्निलोनी याला इटलीतील न्यायालयाने हेलिकॉप्टर करारात खोटी कागदपत्रे सादर करुन भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे, मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपांतून त्यांना मुक्त केले गेले. या दोघांनाही प्रत्येकी १५ हजार युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दोघानीही वरच्या न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान व अन्य अतिविशिष्ट व्यक्तिींच्या (व्हीव्हीआयपी) प्रवासासाठी भारत सरकारने १२ हेलिकॉप्टर पुरविण्यासाठी फिनामेकॅनिका कंपनीच्या ब्रिटनमधील अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर शाखेशी २०१० साली ५६० दशलक्ष युरोचा करार केला होता. हे कंत्राट पदरी पाडून घेण्यासाठी लांच दिल्याचा हा या प्रकरणातील आरोपी ग्येसेप व स्पॅग्निलोनी यांच्या विरोधातील प्रमुख आरोप होता व त्याभोवतीच हा खटला फिरत होता. या प्रकरणात कोणतीही लाच दिली न गेल्याचे इटालियन कोर्टाने म्हटले असून, त्यामुळे भारताचे माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांना दिलासा मिळाला आहे. त्यांची या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु होती. (वृत्तसंस्था)
अगुस्ता वेस्टलँड; फिनामेकॅनिका प्रमुखास कारावास
By admin | Published: October 10, 2014 3:35 AM