शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
3
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
4
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
5
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
6
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
7
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
8
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
9
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
10
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
11
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
12
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
13
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
14
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
15
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
16
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
17
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
18
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
19
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
20
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

‘एआय’ म्हणजे अमेरिका-इंडिया : नरेंद्र मोदी; अमेरिकी काँग्रेसमध्ये ऐतिहासिक भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 6:34 AM

पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा मी येथे आलो तेव्हा भारत दहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होती. आज पाचव्या क्रमांकावर आहे. आता लवकरच तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

वॉशिंग्टन : ‘एआय’ म्हणजे अमेरिका-इंडिया, असे नव्या तंत्राशी नाते जोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळ भारताचा असेल, असे स्पष्ट मत अमेरिकी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात संबोधित करताना व्यक्त केले. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा मी येथे आलो तेव्हा भारत दहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होती. आज पाचव्या क्रमांकावर आहे. आता लवकरच तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पाकिस्तान, चीनकडे बोट दाखवत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ९/११ नंतर दोन दशके आणि मुंबईत २६/११ नंतर एक दशक उलटले तरीही कट्टरतावाद व दहशतवाद संपूर्ण जगासाठी गंभीर धोका आहे. दहशतवाद प्रायोजित करणारे व जगभर पसरवणाऱ्या सर्व शक्तींवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

आजपासून पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौऱ्यावरअमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी हे शनिवारपासून इजिप्तच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १९९७ साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांनी इजिप्तला भेट दिली होती. त्यानंतर इतक्या वर्षांनी प्रथमच भारतीय पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर जात आहेत. 

‘हे युद्धाचे युग नाही’‘मी थेट आणि जाहीरपणे सांगितले आहे की, हे युद्धाचे युग नाही, तर संवाद आणि मुत्सद्देगिरीचे आहे. रक्तपात आणि मानवी दुःख थांबवण्यास आपण सर्वांनी जे काही करता येईल ते केले पाहिजे’, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

चीनवर ताशेरे चीनवर ताशेरे ओढताना मोदी म्हणाले, ‘बळजबरी आणि संघर्षाचे काळे ढग हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात दाटले आहेत. प्रदेशाचे स्थैर्य ही आमच्या भागीदारीच्या मुख्य चिंतेपैकी एक बनली आहे. एक मुक्त व निर्भय हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र असावे, असे आमचे सामायिक धोरण आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका