इस्लामाबाद : पाकिस्तानात मुलांमध्ये एड्स वाढण्याचे कारण खराब आरोग्य सेवा हे आहे. खराब सुया, दूषित रक्ताचा उपयोग यामुळे हा रोग मुलांमध्ये पसरत आहे.डॉक्टरांनी पाकिस्तान सरकारला सांगितले आहे की, दक्षिण सिंध प्रांताच्या राटोडेरोमध्ये पर्याप्त आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने ५९१ मुलांचे आरोग्य धोक्यात असून, त्यांना उपचाराची गरज आहे. या डॉक्टरांनी राटोडेरोमध्ये ३१,२३९ लोकांच्या मेडिकल सूचनांचे अध्ययन केले.या अभ्यासानुसार, ९३० लोकांना एड्स असल्याचे स्पष्ट झाले. यातील ६०४ जणांचे वय पाच वर्षांपेक्षाही कमी आहे.७६३ जणांचे वय १६ वर्षांपेक्षा कमी आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय ‘लान्सेट इन्फेक्शस डिजिज’ पत्रिकेत प्रकाशित झाले आहे. यात असे म्हटले आहे की, पुरेसा औषध पुरवठा होत नसल्याने आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे जुलैच्या अखेरपर्यंत तीनपैकी केवळ एका मुलावर उपचार सुरू होऊ शकला आहे.यात असेही म्हटले आहे की, ५० मुलांंमध्ये रोगप्रतिकारक क्षमता खूपच कमी दिसून आली. यात हे सांगण्यात आले नाही की, ते पूर्णपणे एड्सग्रस्त आहेत काय. (वृत्तसंस्था)असा प्रकार यापूर्वी दिसला नाहीच्कराचीतील आगा खान विद्यापीठाच्या डॉ. फातिमा मीर म्हणाल्या की, पाकिस्तानात गत दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून एड्सचे रुग्ण दिसून आलेले आहेत; पण एवढ्या लहान मुलांमध्ये या रोगाचे प्रमाण यापूर्वी कधी दिसले नाही.
पाकिस्तानात लहान मुलांमध्ये एड्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 5:00 AM