एअर इंडिया एक्स्प्रेसच्या अबू धाबी-कालिकत फ्लाइट IX348 च्या डाव्या इंजिनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. विमानाचे अबुधाबी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. 'अबू धाबीहून कालिकतला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 1 इंजिनला आग लागल्यानंतर परत आले, विमानाने अबू धाबी विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या विमानात एकूण 184 प्रवासी होते.
‘ब्रेकअप’ केल्याने मैत्रीणीवर २५ कोटींच्या भरपाईचा दावा
भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानेही एक निवेदन जारी केले आहे. 'आज एअर इंडिया एक्स्प्रेस ऑपरेटिंग फ्लाइट B737-800 VT-AYC IX348 1000 फूट उंचीवर असताना क्रमांक 1 इंजिनमध्ये आग लागली. यामुळे, उड्डाणाला अबू धाबी विमानतळावर परत जावे लागले.” फ्लाइट-ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 नुसार, एअर इंडियाच्या विमानाने अबू धाबी येथे रात्री ९.५९ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी ३:२९) टेकऑफ केले आणि आपत्कालीन 45 क्रमांकावर कॉल केला. लँडिंग पूर्ण झाले. त्यानुसार, जेव्हा इंजिनला आग लागली तेव्हा विमानाने 1,975 फूट उंची गाठली असावी.