ठळक मुद्देएअर इंडियाच्या विमानाने स्वीडनमधील स्टॉकहोम येथील एका इमारतीला धडक दिल्याची घटना घडली आहे. दिल्लीहून स्टॉकहोमला गेलेल्या या विमानातून 179 प्रवासी प्रवास करत होते. विमानाने इमारतीला धडक दिल्याने विमानाच्या पंखाचे नुकसान झाले आहे.
स्टॉकहोम - एअर इंडियाच्या विमानाने स्वीडनमधील स्टॉकहोम येथील एका इमारतीला धडक दिल्याची घटना घडली आहे. दिल्लीहून स्टॉकहोमला गेलेल्या या विमानातून 179 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. विमानाने इमारतीला धडक दिल्याने विमानाच्या पंखाचे नुकसान झाले आहे.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झाल्यानंतर टर्मिनल 5 पासून 50 मीटर अंतरावर असलेल्या इमारतीला विमानाने धडक दिली. यामध्ये विमानाच्या डाव्या पंखाचे यात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर विमानातील 179 विमानातून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. ही घटना नेमकी कशी घडली याचा अधिक तपास सुरू आहे.