शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

‘त्या’ विमानाचा मुख्य सांगाडा मिळाला

By admin | Published: January 15, 2015 6:12 AM

एअर एशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा मुख्य सांगाडा मिळाला असून, त्यातून राहिलेले मृतदेह बाहेर काढणे शक्य आहे,

जकार्ता, सिंगापूर : एअर एशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा मुख्य सांगाडा मिळाला असून, त्यातून राहिलेले मृतदेह बाहेर काढणे शक्य आहे, असा विश्वास शोध अधिकाऱ्यांना वाटत आहे. दुसरीकडे वर काढलेल्या ब्लॅक बॉक्सचे रेकॉर्डही उलगडण्यात आले असून या विमान दुर्घटनेची सर्व माहिती लवकरच मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. सिंगापूर नौदलाच्या जहाजाने विमानाच्या मुख्य विभागाचा शोध लावला. सिंगापूरचे संरक्षणमंत्री एनजी हेन यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाचा मुख्य सांगाडा मिळाल्याने आता या अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना थोडासा दिलासा मिळू शकतो. या विमानाचा मुख्य भाग मिळणे अत्यंत महत्त्वाचे होते, कारण याच भागात अधिकांश मृतदेह फसले आहेत. आतापर्यंत ४८ मृतदेह मिळाले असून, १६२ प्रवाशांपैकी ११४ मृतदेह अद्याप हाती लागलेले नव्हते. आता ते मिळण्याची आशा आहे. जावा समुद्राच्या तळातून या आठवड्यात विमानाचा डेटा रेकॉर्डर व कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर मिळाला आहे. या सर्व उपकरणातील माहिती मिळाल्यानंतर एअरबस ३००-२०० वरील रहस्य उलगडले जाईल. २८ डिसेंबरला या विमानाचा अपघात झाला होता, त्यात १६२ लोक मरण पावले होते. क्यूझेड ८५०१ हे विमान इंडोनेशियाच्या सुराबायाहून सिंगापूरला चालले होते. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी होऊन माहिती बाहेर पडण्यास एक महिना लागू शकतो. या अपघातग्रस्त विमानाचा शोध बहुराष्ट्रीय पथकाकडून घेतला जात आहे.दरम्यान, आतापर्यंत हाती लागलेल्या ४८ मृतदेहांपैकी ३६ जणांची ओळख पटली आहे. १२ मृतदेह अद्याप ओळखले गेले नाहीत. हवामान वादळी असले तरीही बचावाचे काम चालूच राहील, असा विश्वास इंडोनेशियाच्या बचाव पथकाने प्रवाशांच्या नातेवाईकांना दिला आहे.