बीजिंग : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे सत्तारूढ सीपीसीचे वरिष्ठ अधिकारी यांग जेइची यांच्यासोबत शांघायमध्ये शुक्रवारी चर्चा केली. गेल्या वर्षी डोकलाममध्ये ७३ दिवस निर्माण झालेल्या वादानंतर दोन्ही देशांतील अधिकाºयांतील ही दुसरी चर्चा आहे.सीपीसीच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य यांग यांच्याशी झालेली चर्चा दोन्ही देशांत होणाºया महत्त्वपूर्ण संवादापूर्र्वी होत आहे. डोकलाममध्ये चाललेल्या वादानंतर संबंध पूर्ववत करण्यासाठी दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. स्वराज, सीतारामन यांचाही सहभाग परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या शांघाई कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीत २४ एप्रिल रोजी सहभागी होणार आहेत. एससीओच्या आठ सदस्यांत भारतासह पाकिस्तान नवा देश आहे. एससीओत चीन, कझाखस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत व पाकिस्तान यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
अजित डोवाल यांची चीनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 2:25 AM