शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

अल कायदाशी संबंध; भारतीयाला शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 4:54 AM

अल कायदा या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत केल्याबद्दल आणि अमेरिकेतील एका न्यायाधीशाच्या हत्येचा कट रचल्याबद्दल याहा फारुख मोहम्मद या भारतीय तरुणाला २७ वर्षे व ६ महिने शिक्षा सुनावण्यात आली आहे

वॉशिंग्टन : अल कायदा या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत केल्याबद्दल आणि अमेरिकेतील एका न्यायाधीशाच्या हत्येचा कट रचल्याबद्दल याहा फारुख मोहम्मद या भारतीय तरुणाला २७ वर्षे व ६ महिने शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर याहा फारुख मोहम्मदला मायदेशी पाठवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.मोहम्मद हा इंजिनीअरिंगच्या शिक्षणानिमित्त अमेरिकेत गेला होता. तिथे ओहियो विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर मात्र तो अल कायदाच्या संपर्कात आला. त्याने २००८ मध्ये अमेरिकेतील तरुणीशी विवाह केला आणि तो तिथेच स्थायिक झाला. अल-कायदाचा येमेनमधील नेता अन्वर अल अवलाकी याच्यासाठी मोहम्मद काम करत होता.जुलै २००९ मध्ये याहा मोहम्मद आणि वदोन साथीदार येमेनमध्ये गेले होते. तिथे ते अन्वर अल अवलाकीची भेट घेणार होते. अवलाकी त्यांना भेटू शकला नाही. शेवटी या दोघांनी अवलाकीला कुरिअरमार्फत २२ हजार अमेरिकी डॉलर्स पाठविले. या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाणार होता. या कृत्यासाठी याहा मोहम्मदला अटकही करण्यात आली.तुरुंगात असताना मोहम्मदने तुरुंगातील त्याच्या साथीदाराला न्यायाधीशाची हत्या करायची योजना बोलून दाखविली. ती माहिती मिळताच, एफबीआयचा एक अंडरकव्हर एजंट मोहम्मदच्या संपर्कात आला. त्याने न्यायाधीशाची हत्या करण्याची तयारी दर्शविली. ज्या न्यायाधीशांसमोर खटल्याची सुनावणी सुरू होती, त्याच्या हत्येसाठी याहा मोहम्मदने १५ हजार डॉलर्स देण्याची तयारीही दर्शविली होती. (वृत्तसंस्था)यातील १ हजार डॉलर्स आगाऊ देण्यासाठी मोहम्मदने त्या एजंटला कुटुंबीयांची भेट घेण्यास सांगितले. अमेरिकेतील न्यायालयाने २०१५ मध्ये याहा मोहम्मदच्या भावाला व दोन मित्रांनाही दहशतवादी कारवायांप्रकरणी दोषी ठरविले होते.