Italy PM Giorgia Meloni Birthday: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी यांचा काल(दि.16) 48 वा वाढदिवस होता. यंदाचा वाढदिवस त्यांच्यासाठी खूप खास होता. अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा (PM Edi Rama) यांनी हा सोहळा संस्मरणीय बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अबुधाबीमध्ये झालेल्या वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिटमध्ये एडी रामा यांनी मेलोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गुडघ्यावर बसून गाणे गायले.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिटसाठी अबुधाबीमध्ये आल्या होत्या. यावेळी अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी गुडघ्यावर बसून मेलोनींसाठी 'तांती अगुरी' (इटालियनमध्ये हॅपी बर्थडे) गाणए गायले. यानंतर त्यांनी मेलोनीना एक खास स्कार्फही गिफ्ट केला. हे दृष्य पाहून तिथे उपस्थित इतर नेते प्रभावित झाले अन् त्यांनी टाळ्यांच्या गजरात या क्षणाचे स्वागत केले.
इटालियन डिझायनरने बनवला खास स्कार्फमीडिया रिपोर्ट्सनुसार, भेट दिल्यानंतर रामा यांनी मेलोनीला सांगितले की, त्यांनी एका इटालियन डिझायनरकडून हा खास स्कार्फ डिझाइन करुन घेतला आहे. ही भेट दोन्ही देशांमधील मजबूत नाते दर्शवते. मात्र, रामा आणि मेलोनी यांच्या राजकीय विचारधारा वेगळ्या आहेत. मेलोनी ब्रदर्स ऑफ इटलीच्या उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे नेतृत्व करतात, तर रामा अल्बेनियाच्या समाजवादी पक्षाचे प्रमुख आहेत.